महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Covid Center : मुंबईतील रुग्णसंख्या घटली; कोविड सेंटर बाबात आठ दिवसांत निर्णय

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटली ( Mumbai Corona Cases ) आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसांत रुग्ण वाढतात याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार ( Decision Close Covid Center In Mumbai ) आहे.

Mumbai Covid Center
Mumbai Covid Center

By

Published : Apr 3, 2022, 10:59 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली ( Mumbai Corona Cases ) होती. ही लाट ओसरल्याने मुंबईसह राज्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मास्क वापरणे ऐच्छिक करण्यात आले असून, किती जण त्याचा वापर करतात. तसेच, पुढील 8 दिवसांत रुग्ण वाढतात याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात ( Decision Close Covid Center In Mumbai ) येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

१० जंम्बो कोविड सेंटर बंद करणार -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले आहे. २१ डिसेंबरपासून मुंबईत तिसरी लाट सुरू झाली. जानेवारीत रोज आढळून येणारी रुग्णसंख्या २१ हजारावर पोहचली. रोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली. परंतु, योग्य उपचार पद्धती व मुंबईकरांची साथ यामुळे तिसरी लाट ही परतवण्यात पालिकेला यश आले.

आताच्या परिस्थितीत रुग्णसंख्या ५० च्या आत आढळत असून, मृत्यू दर रोखण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबई प्रमाणे राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने राज्य निर्बंध मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता मास्क लावणे ऐच्छिक करण्यात आले आहे. मास्कमुक्तीनंतर पहिल्या एक दोन दिवस लोकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून आले ही चांगली गोष्ट आहे. तरीही पुढील आठ दिवस रुग्ण संख्येवर लक्ष ठेवणार असून, रुग्ण संख्येत घट सुरुच राहिली तर १० जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.

३ कोविड सेंटर सुरू -मुंबईत एकूण १० जम्बो कोविड सेंटर आहेत. सध्या वरळी येथील डोम, भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास व बीकेसी जंबो कोविड सेंटर, अशी तीन सेंटर सुरु ठेवण्यात आली आहेत. या तीनही सेंटरमध्ये एक दोन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत रुग्ण संख्या नियंत्रणात राहिली तर सगळेच जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येतील, असेही ते म्हणाले. दरम्यान, जम्बो कोविड सेंटर बंद केल्यानंतर तेथील साहित्य पालिकेच्या अन्य रुग्णालयात वापरण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.

ही कोविड सेंटर सुरू, ही बंद -
- दहिसर चेक नाका, कांदरपाडा - एकूण ७०० बेड ( बंद)
- मालाड जम्बो कोविड सेंटर - २२०० बेड ( बंद)
- नेस्को गोरेगाव फेज १ - २२२१ बेड ( बंद)
- बीकेसी कोविड सेंटर - २३२८ बेड ( सुरु)
- कांजूरमार्ग कोविड सेंटर - २००० बेड (बंद)
- शीव जम्बो कोविड सेंटर - १५०० बेड ( बंद)
- आरसी भायखळा सेंटर - १००० बेड ( सुरु)
- आरसी मुलुंड जम्बो सेंटर - १७०८ बेड ( बंद)
-एनएससीआय वरळी - एकुण ५०० बेड ( सुरु)
- नेस्को गोरगाव फेज २ - १५०० बेड ( बंद)

हेही वाचा -Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरुन घसरले; 6 जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details