महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deccan Queen Express डेक्कन क्वीन अन् इंटरसिटी एक्सप्रेस आज उशिरा धावणार - डेक्कन क्वीन एक्सप्रेस

मुंबई पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही आज पुण्याहुन मुंबईकडे येताना सीएसएमटी रेल्वे स्थानकात उशिरा आल्याने असल्यामुळे सिएसमटीहून उशिराने सुटणार आहे Deccan Queen Express तर पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस ही देखील आज मंगळवार (दि 16 ऑगस्ट)रोजी उशिराने धावत आहे मध्य रेल्वेवरील पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन आज तांत्रिक बिघाडामुळे काही कारणास्तव थांबवण्यात आली होती

डेक्कन क्वीन एक्सप्रेस
डेक्कन क्वीन एक्सप्रेस

By

Published : Aug 16, 2022, 5:47 PM IST

मुंबई -मुंबई पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही आज पुण्याहुन मुंबईकडे येताना सीएसएमटी रेल्वे स्थानकात उशिरा आल्याने असल्यामुळे सिएसमटीहून उशिराने सुटणार आहे तर पुणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस ही देखील आज मंगळवार (दि 16 ऑगस्ट)रोजी उशिराने धावत आहे मध्य रेल्वेवरील पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन आज तांत्रिक बिघाडामुळे काही कारणास्तव थांबवण्यात आली होती Deccan Queen Express ट्रेन थांबवल्या गेल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद लोकल देखील उशिराने धावत आहे एक वाजताची ठाणे या रेल्वे स्थानकावर येणारी व मुंबईकडे जाणारी लोकल तब्बल पन्नास मिनिट आज उशिराने आली त्यामुळे प्रवाशांना खोळंबा झाला 4 लोकलची गर्दी एकाच लोकलमध्ये झाली परिणामी जनतेची गैरसोय झाली

वाहतुकीला खोळंबा झाला यंदा तुफान पाऊस पडूनहीं रेल्वे उशिरा धावणे रेल्वेच्या गाड्या पाण्यामुळे थांबणे असे प्रकार तुरळक झाले मात्र आज सकाळपासून मुंबई ठाणे कल्याण परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला थोड्या वेळ पडलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल उशिराने धावू लागल्या ठाणे रेल्वे स्थानकावर येणारी दुपारी 1 वाजेची लोकल तब्बल 50 मिनिटे उशीराने धावत आहे त्यामुळे प्रवाश्यांची फलाटावर झुंबड उडाली याबाबत रेल्वे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना माहिती दिली की पावसामुळे आज सर्व रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत तसेच भरीसभर म्हणून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या डब्यात तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद वाहतुकीला खोळंबा झाला आता मार्ग पूर्ववत केला आहे

डेक्कन क्वीन व इंटरसिटी एक्स्प्रेस आज उशिराने धावणार तसेच मुंबई पुणे डेक्कन अप ट्रेन ही मुंबईला उशिरा पोहोचल्याने सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटं ऐवजी 6 वाजून 10 मिनिटांनी ती सुटेल तसेच पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस जी 5 वाजून 55 मिनिटांनी अप ट्रेन उशिराने पोहोचल्यामुळे आज रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी तसेच प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना दिलगिरी व्यक्त केली आहे

हेही वाचा -Mumbai Drug Seizure १ हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज मुंबई पोलिसांकडून जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details