महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deccan Odyssey Special Train : तब्बल दोन वर्षानंतर 'डेक्कन ओडिसी' महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सज्ज! - डेक्कन ओडिसी महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सज्ज

सर्व निर्बंध हटल्याने पर्यटकांच्या सेवेसाठी डेक्कन ओडिसी ( Deccan Odyssey Special Train )गाडी पुन्हा सज्ज झाली आहे. सध्या डेक्कन ओडिसीच्या २२ डब्यांची देखभाल दुरुस्ती माटुंगा वर्कशॉपमध्ये ( Matunga Workshop Mumbai ) सुरु असून मे महिन्याच्या अखेरीस पर्यटकांसाठी रुळावर येईल, असा विश्वास एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे ( Dinesh Kamble General Manager MTDC ) यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केला आहे.

डेक्कन ओडिसी
डेक्कन ओडिसी

By

Published : May 5, 2022, 8:14 PM IST

मुंबई -महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी भारतीय रेल्वेच्या मदतीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ( एमटीडीसी ) सुरू केलेली डेक्कन ओडिसी ही अलिशान रेल्वे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत उभी आहे. मात्र, सर्व निर्बंध हटल्याने पर्यटकांच्या सेवेसाठी डेक्कन ओडिसी ( Deccan Odyssey Special Train )गाडी पुन्हा सज्ज झाली आहे. सध्या डेक्कन ओडिसीच्या २२ डब्यांची देखभाल दुरुस्ती माटुंगा वर्कशॉपमध्ये ( Matunga Workshop Mumbai ) सुरु असून मे महिन्याच्या अखेरीस पर्यटकांसाठी रुळावर येईल, असा विश्वास एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे ( Dinesh Kamble General Manager MTDC ) यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केला आहे.



ईबिक्स या कंपनीकडे स्टेअरिंग :भारतात महाराजा एक्स्प्रेस, गोल्डन चॅरियटन, रॉयल राजस्थान ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी अशा लक्झरी ट्रेन पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसी व रेल्वे विभागाने संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डेक्कन ओडिसी लक्झरी गाडी २००४ साली सुरू केली होती. मात्र, या गाडीला विदेशातील पर्यटकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ती आर्थिक अडचणीत सापडली. त्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनी कॉक्स ऍण्ड किंग्जकडे ही गाडी ५ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर दिली होती. मात्र ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर, आता ईबिक्स या कंपनीच्या हाती डेक्कन ओडिसीचे स्टेअरिंग देण्यात आले आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे डेक्कन ओडिसी जागीच उभी होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने डेक्कन ओडिसी गाडी महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सज्ज झाली आहे.


पर्यटनासाठी धावण्यास सज्ज :एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, कोरोना प्रादुर्भावामुळे डेक्कन ओडिसी उभी होती. मात्र, आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्याने आता डेक्कन ओडिसी गाडी पर्यटनासाठी धावण्यास सज्ज आहे. मात्र, दोन वर्ष डेक्कन ओडिसी बंद असल्याने या रेल्वे गाडीचे इंजिनचे आणि डब्याची देखभाल दुरुस्तीचे काम माटुंगा वर्कशॉपमध्ये सुरु आहे. याशिवाय या गाडीच्या रंगरंगोटीचे काम महिन्याचा शेवटच्या आठ्वड्यापर्यत पूर्ण होण्याची आशा आहे. त्यानंतर, पर्यटकांसाठी गाडीचे बुकिंग सुरु केले जाईल. सध्या सर्वसामान्य पर्यटकांना या डेक्कन ओडिसीचा पर्यटन प्रवास परवडेल असे नियोजन सुरु आहे.


अशी आहे डेक्कन ओडिसी :या डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्टिम, उंची फर्निचर, पलंग, वातानुकूलित यंत्रणा असलेले ११ डिलक्स डबे आणि २ लक्झरी डबे आहेत. आलिशान रेल्वेगाडीपेक्षाही ही गाडी ‘चाकावरचे पंचतारांकित हॉटेल’ वाटावे यादृष्टीने दोन शाही रेस्टॉरंट, बार, जिम्नॅशियम, कॉन्फरन्स रूम अशा सुविधा देखील आहेत.

हेही वाचा -Rana Couple : नवनीत राणांची अखेर सुटका; तपासणीसाठी लीलावती रूग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details