मुंबई - इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून संजय राऊत आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी एका मुलाखतीत बोलताना राऊत यांनी इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाल्याचे म्हटले. राऊत यांनी केलेल्या या विधानावरून काँग्रेस नेते आणि राऊत यांच्यात वादाला तोंड फुटले आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया.... राऊतांच्या विधानाचा संजय निरूपम आणि मिलिंद देवरांनी ट्विटरवर घेतला समाचार...
संजय निरूपम यांची राऊतांवर बोचरी टीका, 'शिवसेनेच्या मिस्टर शायरने लोकांची शायरी सांगून मनोरंजन करावे... तसेच त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात जे विधान केले ते परत घ्या' अशी मागणी निरूपम यांनी केली.
इंदिरा गांधी खऱ्या देशभक्त... देवरांनी राऊतांना सुनावले
इंदिरा गांधी या खर्या देशभक्त होत्या. ज्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत कधीही तडजोड केली नाही, असे सांगत मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांना आपले विधान मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा... शिवाजी महाराजांची उपाधी 'छत्रपती' हीच होती, 'जाणता राजा' नव्हे - शरद पवार
इंदिरा गांधी यांच्या बाबत केलेल्या 'त्या' विधानाबाबत संजय राऊतांचे स्पष्टीकरण..
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यात मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना इंदिरा गांधी यांबाबत एक विधान केले. यात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाली असल्याचे म्हटले होते. दरम्यान, गुरूवारी संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. 'जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत', असे राऊत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबतच्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, 'इंदिरा गांधी यांच्याबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे.
जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले. आपण केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे सांगितले. तसेच करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठाणांच्या समस्यांबाबत ते इंदिरा गांधींना भेटले होते.' असे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'उदयनराजेंच्या विरोधात विधान केल्यास ठोकून काढू'- मराठा क्रांती मोर्चा