महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mukesh Ambani Threat मुकेश अंबानींना धमकी देणारा दहिसरमधून अटक - kill Mukesh Ambani

मुकेश अंबानी Mukesh Ambani यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात Death threat to Mukesh Ambani आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्श फाऊंडेशन रुग्णालयात Reliance Foundation Hospital आला आहे.

Mukesh Ambani Threat
Mukesh Ambani

By

Published : Aug 15, 2022, 3:07 PM IST

Updated : Aug 15, 2022, 7:05 PM IST

मुंबईदेशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी Mukesh Ambani यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात Death threat to Mukesh Ambani आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्श फाऊंडेशन रुग्णालयात आला आहे. महत्वाचे म्हणजे सकाळपासून तब्बल ८ वेळा असा धमकीचा फोन आला आहे. आज सकाळी १०.३० जवताच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या Reliance Foundation Hospital सार्वजनिक क्रमांकावर एका अनोळखी क्रमांकावरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. त्यानंतर याप्रकरणी डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विष्णू भूमी वय 50 याला दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे.

मुकेश अंबानींना धमकी

आरोपीला अटकअंबानी धमकी प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे नाव विष्णू भूमी वय 50 असे आहे. त्याने अफझल नावाने कॉल करून रिलायन्स रुग्णालयात साडेदहा ते साडेअकरा या दरम्यान दहा मिनिटांनी कॉल करून मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीचे ज्वेलरीचे दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा याबाबतची सविस्तर माहिती मुंबई पोलिसांकडून घेत आहेत.

हेही वाचाOperation Meghdoot सियानमध्ये जवानाचे आढळले ३८ वर्षानंतर पार्थिव मेघदुत ऑपरेशनमध्ये बजाविली होती कामगिरी

सीआरपीएफच्या जवानांचे पथक डी बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखलमुंबई पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत संशयिताला दहिसरहून ताब्यात घेतले. या संशयिताची एटीएस ATS देखील चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहिसर येथे मुंबई पोलिसांच्या परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल बासू डी बी मार्ग पोलिसांचे पथक यांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. तसेच मुंबई पोलिसांची एक टीम अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलिया Antelia परिसरातही पोहोचली आहे. अँटेलिया परिसरात पोलिसांकडून पाहणी केली जात असून खाजगी सुरक्षारक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा अँटिलीयाबाहेर तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे संशयिताबाबत माहिती जाणून घेण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांचे पथक squad of CRPF jawans डी बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

हेही वाचाAmbani family अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबीयांना फोनवरून धमकी मुंबई पोलिसांचा तपास सुरू

Last Updated : Aug 15, 2022, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details