महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Threats To Katrina and Vicky : अभिनेत्री कॅटरिना आणि तीचा पती विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी - Actress Katrina Kaif

अभिनेत्री कॅटरिना कैफ ( Actress Katrina Kaif ) आणि तिच्या पती विकी कौशल (Vicky Kaushal) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली ( received death threats) आहे. कॅटरिनाला मिळालेल्या धमकीमुळे बाॅलिवूडमध्ये (Bollywood) खळबळ माजली आहे. या अगोदर सलमान खानला (Salman Khan) धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Katrina and Vicky Kaushal
कतरिना आणि विकी कौशल

By

Published : Jul 25, 2022, 11:43 AM IST

Updated : Jul 25, 2022, 1:04 PM IST

मुंबई:बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कटरीना कैफला सोशल मीडियावर फाॅलो करत असलेल्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे. कटरीनाचा पती विकी कौशल याने सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात आदित्य राजपूत या युवकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. कतरिनाला एक व्यक्ती सोशल मीडियावर फाॅलो करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीने तक्रार दिली आहे. संध्याकाळ पोलिसांकडून आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फाॅलो करतात. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

समजावल्यावरही ऐकले नाही :कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमैत्रिणींसह हे दोघं नुकतेच मालदिवला गेले होते. मालदिव व्हॅकेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत होते. दरम्यान त्यांना सोशल मीडियावर धमकी मिळाली असून त्यात नेमकं काय म्हटलेय हे अद्याप बाहेर आलेले नाही. आदित्य राजपूत नावाच्या व्यक्तिने ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. विकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यानंतरही तो कतरिनाला फाॅलो करत होता. अखेर विकीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

स्वरा भास्करला धमकी: बाॅलीवुड आणि धमक्या किंवा खंडणीसाठी त्रास देणे या गोष्टी नव्या नाहीत. विकी आणि कतरिनाच्या आधी जूनमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. हे पत्र वर्सोवा येथील निवासस्थानी पाठवण्यात आले होते. पत्र मिळाल्यानंतर स्वराने वर्सोवा पोलिस स्टेशन गाठले आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. सेलिब्रेटींना यशाचा आनंद लुटण्याबरोबरच त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आणि खंडणीचे कॉल मिळणे असामान्य राहिलेले नाही.

सलमान आणि सलीम खांन यांनाही पत्र: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही महिन्याभरापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. सलीमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हे पत्र सापडले. सलीम खान मॉर्निंग वॉक करताना ज्या ठिकाणी बसतात तेथे हे पत्र सापडले. या पत्रात म्हटले आहे की 29 मे रोजी गोळ्या घालून ठार झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला प्रमाणे मारुन टाकू . गेल्या आठवड्यात, सलमानने मुंबई पोलिस मुख्यालयाला भेट दिली जिथे त्याने आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळविण्यासाठी लेखी अर्ज सादर केला.

कंगना रणौतचीही तक्रार : नोव्हेंबर 2021 मध्ये, अभिनेत्री कंगना रणौतने हिमाचल प्रदेशमधील एका पोलिस स्टेशनमध्ये शेतकरी आंदोलनाच्या आंदोलकांवर केलेल्या टीकेवर तीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तीने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सना याबद्दल माहिती दिली होती. ती म्हणाली होती की, मी धमक्यांच्या विरोधात पोलिसात एफआयआर नोंदवला आहे. मला आशा आहे की पंजाब सरकारही लवकरच कारवाई करेल. माझ्यासाठी देश सर्वोत्कृष्ट आहे, यासाठी मला बलिदान द्यावे लागले तरी मला ते मान्य आहे, पण मी घाबरत नाही आणि कधीही घाबरणार नाही.

हेहीवाचा : Darlings trailer: आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या अभिनयाची कमाल असलेला 'डार्लिंग'चा ट्रेलर रिलीज

Last Updated : Jul 25, 2022, 1:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details