मुंबई- कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर असल्याची जाणीव भारतीयांना आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी देशात लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. मात्र एका नोबल पुरस्कार विजेत्याच्या वक्तव्यामुळे जगात खळबळ माजली आहे. फ्रेंचचे नोबल पुरस्कार विजेते ल्यूक मॉन्टेनियर यांच्या मतानुसार, 'कोरोना प्रतिबंधक लस घातक आहे. ही लस ज्या लाभार्थ्यांनी घेतली, त्याचा दोन वर्षांत मृत्यू होईल'.
'लस संपूर्णपणे सुरक्षित'
नोबल पुरस्कार विजेत्यांचा दावा ल्यूक मॉन्टेनियर यांचे वरील आशयाचे पोस्टर त्यांच्या नावा सह सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ल्यूक मॉन्टेनियरने केलेल्या दाव्यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. असे असतांना भारतातील प्रसार माध्यमातील विश्वसनीय संस्था पीआयबी (PIB) च्या फॅक्ट चेक टीमने या पोस्टच्या खोलात जावून चौकशी केली आहे. ल्यूक मॉन्टेनियर यांच्या नावासह सोशल मीडियावर वायरल होणारे पोस्टर आणि त्यातील माहिती फेक असल्याचे म्हटल आहे. तसेच पीआयबी (PIB)ने देखील म्हटले आहे की, लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच चूकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नये.
हेही वाचा -#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..