मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त (Balasaheb Thakre 9th Death Anniversary) अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर दाखल झाले. भगवी वस्त्र, डोक्यावर टोपी, 'बाळासाहेब परत या' हा जयघोष करत भावूक होऊन शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवत स्मृतींना उजाळा दिला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना नेत्या नीलम गोरे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह दिग्गजांनी बाळासाहेबांना अभिवादन केले.
शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी उसळली -
बाळासाहेब ठाकरेंना सर्व पक्षीय नेत्यांचे अभिवादन - बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन
गेल्यावर्षी कोरोनामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनावर काही निर्बंध आले होते. यंदा कोरोना चांगलाच आटोक्यात आल्यानंतर राज्यातील व्यवहार पूर्वपदावर आला आहे. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त (Balasaheb Thakre 9th Death Anniversary) स्मृतीस्थळ अभिवादनासाठी खुले केले. राज्यभरातून शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी भगवे वस्त्र, डोक्यावर टोपी परिधान करून सकाळपासून गर्दी केली. शिवसेना भवन ते शिवाजी पार्क परिसरात यामुळे भगवी झालर पसरल्याचे दिसून आले. स्मृती स्थळावर फुलांची आरास, भगवे झेंडे आणि सजावट करण्यात आली होती.

गेल्यावर्षी कोरोनामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनावर काही निर्बंध आले होते. यंदा कोरोना चांगलाच आटोक्यात आल्यानंतर राज्यातील व्यवहार पूर्वपदावर आला आहे. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या (Balasaheb Thakre 9th Death Anniversary) स्मृतिदिनानिमित्त स्मृतीस्थळ अभिवादनासाठी खुले केले. राज्यभरातून शिवसैनिकांनी (Shiv Sainiks) आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी भगवे वस्त्र, डोक्यावर टोपी परिधान करून सकाळपासून गर्दी केली. शिवसेना भवन ते शिवाजी पार्क परिसरात यामुळे भगवी झालर पसरल्याचे दिसून आले. स्मृती स्थळावर फुलांची आरास, भगवे झेंडे आणि सजावट करण्यात आली होती. स्मृतिस्थळाच्या समोरील बाजूस फुलांची आरास काढून मध्ये बाळासाहेबांची प्रतिमा ठेवली होती. हे चित्र शिवसैनिक सेल्फीद्वारे मोबाईलमध्ये टिपत होते. येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात ठेवला होता. ये- जा करणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. राजकीय पक्षांतील नेत्यांची मोठी मांदियाळी अभिवादन करण्यासाठी येथे दिसून आली. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर मोठी स्फूर्ती, शक्ती, ऊर्जा मिळते. तसेच बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी सांगितले.
विरोधकांच्या विरोधात लढण्याची शक्ती मिळावी -
महाराष्ट्रात मध्यवर्ती विधिमंडळात बाळासाहेबांना पहिल्यांदाच श्रद्धांजली वाहण्यात आली. देश, धर्म, देव आणि राज्याबाबत बाळासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात. बाळासाहेबांमुळे अनेक प्रश्नांवर चांगले काम करण्याची संधी मिळाली. काही लोकांनी जो उच्छाद मांडला आहे, त्या विरोधात लढण्याची शक्ती मिळावी अशी, प्रार्थना बाळासाहेबांना केल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या. शिवसेनाप्रमुखांनी मंत्र दिला आहे
तशीच वाटचाल करत असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून त्यात सुधारणा होत असल्याचेही ते म्हणाले. बाळासाहेबांमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ मिळते. बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकांना मोठ्या पदावर पोहचवले, असे दादा भुसे (Dadaji Bhuse) यांनी सांगितले.
महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार -
देश प्रेम हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनात अखंड दिसून येतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे काळजी घेत नियम पाळून येथे आदरांजली वाहण्यात आली. आता प्रभाव कमी झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर स्मृतिस्थळ खुले ठेवण्यात आले आहे. शिवसैनिक शिस्त प्रिय आहेत. त्यामुळे सगळ्यांना दर्शन मिळेल. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेला मिळाले, पण त्याहून महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्रिपद म्हणून राज्याला लाभला आहे. सन1997 च्या निवडणुका उद्धव ठाकरे यांनी सांभाळल्या. मुंबई महापालिकेत पाच वेळा सत्ता राखून भगवा झेंडा फडकवला आहे. कोरूना काळानंतर आलेल्या सर्वेक्षणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावलौकिक मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुजलाम, सुफलाम, महाराष्ट्र करून दाखवायचा आहे असा निर्धार शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केला. तर शिवसेना लोकांना खोटी आश्वासने देत नाही. त्यामुळेच शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेना कोणाला घाबरत नाही, आम्हाला आव्हान देण्याची सवय आहे. आम्ही त्यात विजय होतो, असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी व्यक्त केला.
हिंदुत्वाची मशाल बाळासाहेबांनी पेटवली आणि ती पेटत राहील. पण कोणी नाटक करत असेल तर त्याला आपण काय बोलणार? बाळासाहेबांच्या नावाने अनेकांनी पदे भूषवली. मात्र त्यानंतर काहींना त्याचा विसर पडला. त्यांनी मग बदनामी करायला सुरुवात केली, असा अप्रत्यक्ष टोला माजी आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना लगावला.
शिवसेना-भाजप एकत्र येण्याबाबत चर्चा करणार -
प्रबोधनकार ठाकरे हे बाबासाहेबांचे चांगले मित्र होते. आता आमचे राजकीय निर्णय जरी वेगळे असले शिवसेनेबद्दल आदर आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊ शकते का, हे पाहावे लागेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले. पुढे भाजप आणि एकत्र येतील असा विचार करायला हवा. भाजपनेही शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यायला हरकत नाही. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांशी यासंदर्भात मी बोलणार आहे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मला त्रास देणार यांचा लवकरच भंडाफोड -
बाळासाहेबांमुळे मराठी माणूस ताठमानेने जगतो आहे. आजही बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा येतो. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या साहेबांनी मोठे केले. मी एक कडवा शिवसैनिक असून शेवटपर्यंत भगव्याशी बेइमानी करणार नाही, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केले. तसेच मला त्रास देणाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा दिला. तर बाळासाहेबांची सर्वात जास्त आठवण येते. अंगावर घ्यायचं पण सूड म्हणून नाही, हे त्यांचे धोरण आपल्याला खूप भावते, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगत बाळासाहेबांना अभिवादन केले.