मुंबई -गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा पिल्लू मृत अवस्थेत Dead Leopard Cub Found सापडला आहे. पिल्लू बराच काळ आजारी होता, अशी माहिती पुढे आली आहे. आरे पोलीस आणि राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dead Leopard Cub Found Mumbai : गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आढळले मृत बिबट्याचे पिल्लू - बिबट्याचा पिल्लू गोरेगाव मुंबई
गोरेगाव परिसरातील फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा पिल्लू मृत अवस्थेत Dead Leopard Cub Found सापडला आहे. पिल्लू बराच काळ आजारी होता, अशी माहिती पुढे आली आहे.
रविवारी सकाळी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला, असे वन अधिकाऱ्याने सांगितले. शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेल्या मृतदेहावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. वन नियंत्रण कक्षाला सकाळी 10.30 च्या सुमारास उपनगरातील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये नर बिबट्या मृतावस्थेत पडल्याचा फोन आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात मदत होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. बिबट्याच्या मृत्यूची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना दिली आहे, असेही ते म्हणाले.