महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच - Dead Fishes seen at Miramar beach

शहरालगत असणाऱ्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर अनेक मासे मृतावस्थेत आढळून आले. मांडवी नदीत होणारे प्रदूषण व पर्यावरणीय बदलामुळे हे मासे मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच
मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच

By

Published : Oct 15, 2021, 7:20 PM IST

पणजी : निसर्गातील पर्यावरणीय बदल व जलप्रदूषणाचा फटका समुद्री जीवांना बसत आहे. असाच फटका पणजी शहराला लागून असणाऱ्या मिरामार समुद्रकिनारी भागातील माशांना बसला आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अनेक मृत माशांचा खच किनाऱ्यावर आढळून आला आहे. पर्यावरणात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे अनेक मासे मृतावस्थेत समुद्रकिनारी आढळून आल्याचे सांगितले जात आहे. या मृत माशांचा खच हा कित्येक मीटर पर्यंत पसरला होता.

मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच
नागरिकांत भीतीचे वातावरणपणजी शहराला लागूनच असलेल्या या समुद्रकिनारी अनेक पर्यटक व स्थानिक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. सकाळ, संध्याकाळी व्यायाम ,विविध खेळ खेळण्यासाठी येथील स्थानिक नागरिकही किनाऱ्यावर फिरत असतात अचानक अशाप्रकारे मृत माशांचा खच आढळून आल्यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरामार समुद्रकिनारी मृत माशांचा खच
याधीही अशीच परिस्थितीसप्टेंबर महिन्याच्या दरम्यान पर्यावरणीय बदलामुळे अनेक छोट्या प्रजातीचे खेकडे समुद्रकिनारी भागात आढळून आले होते. यावेळी मात्र मृत माशेच किनाऱ्यावर आढळून आल्यामुळे लोकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.मांडवीच्या प्रदूषणाचा फटकाराज्याची मुख्य जीवनवाहिनी असणारी मांडवी नदी वाहत जाऊन मिरामर समुद्रकिनारी सागराला मिळते, मात्र मांडवी नदीत शहरातून वाहून जाणारे सांडपाणी थेट मांडविला जाऊन मिळतात त्यामुळेच या नदीच्या प्रदूषणात भर पडली आहे. त्याचा थेट परिणाम समुद्री जीवांवर होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details