मुंबई -काळबादेवी येथील एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील चौथे आरोपी डीसीपी सौरभ त्रिपाठी अद्याप फरार असून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सौरभ त्रिपाठीच्या शोधाकरिता पाच पथके इतर राज्यात पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप तरी त्रिपाठी ( DCP Saurabh Tripathi search operation in other states ) यांचा शोध लागलेला नाही. मात्र, त्रिपाठी यांना हवालाद्वारे पैसे पुरवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी अटक केली असून त्यास आज मुंबईला आणणार आहे.
हेही वाचा -Shiv Abhiyan : शिवसेनेचे 'शिव संपर्क' अभियान, उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन
आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्याभोवतीचा फास मुंबई पोलिसांनी चांगलाच आवळला आहे. त्यांच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखेची पाच पथके उत्तर प्रदेशात गेली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली असून त्रिपाठींच्या सूचनेनुसार त्याने पोलीस निरीक्षक ओम वांगटेकडून हवालाद्वारे पैसे स्विकारल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी दीड लाखांची रोकड जप्त केली आहे. अंगडियाकडून आरोपींनी 19 लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत असल्याने त्रिपाठींच्या अडचणी वाढल्या आहेत.
त्रिपाठीच्या शोधासाठी इतर राज्यात 5 पथके रवाना
व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाल्यापासून डीसीपी सौरभ त्रिपाठी कुठे आहे, हे कुणालाही माहीत नाही. सौरभ त्रिपाठीच्या शोधासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. क्राईम ब्रांचचे पथक सौरभ त्रिपाठीचा उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये शोध घेत आहे. परंतु, अद्याप डीसीपी सौरभ त्रिपाठीबद्दल काहीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. मात्र डीसीपी सौरभ त्रिपाठीला हवालाद्वारे पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. आज या व्यक्तीला मुंबईत आणण्यात येणार असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सौरभ त्रिपाठी यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव