मुंबई -मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा पडला आहे. सामान्य नागरिकांचा पैसा काही लोकांच्या तिजोरीत गेला आहे. हे सर्व बदलण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेवर mumbai corporation election 2022 शिवसेना भाजपा युतीचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा. भाजपाने केलेली कामे आणि उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी केलेला भ्रष्टाचार मुंबईकरांच्या समोर मांडा, असे स्पष्ट आदेश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचेही फडणवीसांना नमूद केलं dcm devendra fadnavis criticized uddhav thackeray आहे.
निवडणुकीचे रणशिंग फुंकले - आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, मंगलप्रभात लोढा हे राज्यात मंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या दोघांचा सत्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनमुखानंद हॉल, माटुंगा येथे करण्यात आला. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महापालिका निवडणुकीचे फडणवीस यांनी रणशिंग फुंकले.
'महापालिकेवर भगवा फडकवा' - यावेळी फडणवीस यांनी म्हटलं, पालिकेला भ्रष्टाचार विळखा पडला आहे. काही कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. ही कामे या लोकांची दुभती गाय आहे. या लोकांनी कोरोनात ही कोट्यवधी रुपये खाऊन टाकले. मुंबईचे सौदर्यकरण केलं असे सांगतात. मग पिण्याच्या पाण्याची समस्या यांनी का सोडवली नाही. मुंबई ही एका परिवाराची, घराण्याची ठेवायची नाही. मुंबईकर लोकांकडे पाहणारे, त्यांचे प्रश्न सोडविणारे लोक निवडून द्यायचे आहेत पक्षाने महापालिकेची मोहिम फत्ते करायला आशिष शेलार यांच्या रूपाने बिनीचा शिलेदार निवडला आहे. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेवर भगवा फडकवा, असे आदेश फडणवीस यांनी दिले.