मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आपले चोपदार विलास मोरे (Vilas More) यांची मुलगी आणि जावयाचा हट्ट पुरवला आहे. अजित पवार हे नेहमीच आपल्या ताठर भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. ते सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका घेत असून, त्यात ते व्यस्त असतात. अजित पवार यांचे अनोखे रुप मंत्रालयातील उपस्थितांनी अनुभवले आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदाराच्या मुलीची आणि जावयाची भेटण्याची इच्छा पूर्ण केली.
- अर्थसंकल्पाच्या कामांमध्ये अजित पवार व्यस्त -
शिस्तीसाठी कडक असलेले अजित पवार नेहमीच आपली भूमिका रोखठोकपणे मांडतात. पक्षातला एखादा कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक अजित पवार यांच्याकडे काम घेऊन गेला, तर ते काम जर होणारे असेल तर अजित पवार तेथेच त्या कामाचा निपटारा करून टाकतात. त्यामुळे कामातला स्पष्टपणा ही नेहमीच अजित पवारांची ओळख राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या अशा कडक भूमिकेला नेहमीच कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक ओळखून आहे. सध्या अजित पवार अर्थसंकल्पाच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत विविध विभागाच्या बैठकांचे सत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार हे आपल्या कामांमध्ये अगदी व्यस्त असताना दिसतात. मात्र, असे असताना अजित पवार यांनी आपले चोपदार विलास मोरे यांच्या मुलीचा आणि जावयाचा त्यांना भेटण्याचा हट्ट पुरवला आहे.
- चोपदार विलास मोरे काही दिवसात होतायेत सेवानिवृत्त -