महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramadan Eid : दाऊदी बोहरा समाजाची रमजान ईद उत्साहात

मिश्री कॅलेंडरनुसार दाऊदी बोहरा समाजाची ईद उल फित्र ( Eid Ul Fitr 2022 ) आज पुण्यात उत्साहात साजरी करण्यात ( Dawoodi Bohra community celebrates Ramadan Eid ) आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्ष लावण्यात आलेल्या निर्बंधांनंतर रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

Dawoodi Bohra community celebrates Ramadan Eid
दाऊदी बोहरा समाजाची रमजान ईद उत्साहात

By

Published : May 2, 2022, 11:51 AM IST

पुणे - मिश्री कॅलेंडरनुसार दाऊदी बोहरा समाजाची ईद उल फित्र ( Eid Ul Fitr 2022 ) आज उत्साहात साजरी करण्यात ( Dawoodi Bohra community celebrates Ramadan Eid ) आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 वर्ष लावण्यात आलेल्या निर्बंधांनंतर रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

कोरोनानंतर पुन्हा ईद साजरी झाल्याने आनंद - शहरातील सैफी मशीद यांसह अन्य दाऊदी बोहरा समाजाच्या मशिदींत सकाळी 6 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. यानंतर धर्मगुरू यांचा खुतबा झाला. त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांचे गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदची नमाज अदा केल्यानंतर ईदनिमित्त वि‌शेष खुदबा (धार्मिक प्रवचन) पठण करण्यात आले होते. यानंतर या सैफी मशिदीत समस्त मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. देशात समाजात शांती व स्थैर्य नांदो, अशी प्रार्थनाही करण्यात आली. रमजानच्या संपूर्ण महिना तरावीहची विशेष नमाज; तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्‍वी आयोजनासाठी समाजातील मान्यवरांचेही आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. लहान मुलांनी आलीम सहाब आणि घरातील ज्येष्ठांची भेट घेऊन ईदचा सण साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details