महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दाऊद इब्राहिम भावांना दर महिन्याला 10 लाख रुपये पाठवतो; ईडीच्या तपासात खुलासा - Dawood Ibrahim sends Rs 10 lakh

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला दिलेल्या जवाब सांगितले आहे, की दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असून तो दर महिन्याला 10 लाख रुपये त्याच्या भावंडांना पाठवतो, अशी धक्कादायक माहिती इक्बाल कासकरने दिली आहे.

दाऊद इब्राहिम
दाऊद इब्राहिम

By

Published : May 25, 2022, 10:52 AM IST

मुंबई -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला दिलेल्या जवाब सांगितले आहे, की दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असून तो दर महिन्याला 10 लाख रुपये त्याच्या भावंडांना पाठवतो, अशी धक्कादायक माहिती इक्बाल कासकरने दिली आहे.


खालिदचा भाऊ, जो कासकरचा बालपणीचा मित्र होता तो टोळीयुद्धात मारला गेला. तो दाऊदची बहीण हसिना पारकरचा ड्रायव्हर-कम-बॉडीगार्ड सलीम पटेल हिलाही ओळखत होता. खालिदने ईडीला सांगितले की एकदा पटेलने त्याला सांगितले होते की तो हसीनासह दाऊदच्या नावाचा वापर करून पैसे उकळत आहे आणि मालमत्तांवर अतिक्रमण करत आहे. ईडीचा आरोप आहे की पटेल आणि हसिना यांनी मुंबईतील कुर्ला भागातील गोवाला कंपाऊंड बेकायदेशीरपणे बळकावले जे त्यांनी नंतर मलिकच्या कुटुंबाला विकले.


कासकर आणि हसीनाचा मुलगा अलीशाह यांच्यासह अनेक साक्षीदारांनी दाऊदच्या पाकिस्तानात वास्तव्याबद्दलही सांगितले आहे. त्याच्या पत्नीचे नाव मेहजबीन आहे. त्याला पाच मुले आहेत. मोईन नावाचा एक मुलगा आहे. त्याच्या सर्व मुली विवाहित आहेत. त्याच्या मुलानेही लग्न केले आहे. ज्याला खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कासकर पुढे म्हणाले की 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अनीस हा आणखी एक भाऊही पाकिस्तानात राहतो. अलीशाने ईडीला सांगितले की दाऊद कराचीमध्ये असल्याचे मला सूत्रांकडून आणि कुटुंबीयांकडून कळले आहे. अधूनमधून जसे की ईद, दिवाळी आणि इतर सणासुदीच्या प्रसंगी मेहजबीन माझी पत्नी आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details