महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'डी' कंपनीचा खंडणी वसूलीसाठी नवा फंडा, व्हॉट्सअपवर व्हॉईस रेकॉर्डिंग करुन मागतायत खंडणी - mumbai police

रिजवान भारतातून दुबईला पळण्याच्या बेतात होता. मात्र, त्याला पोलिसांनी विमानतळावरुन अटक करण्यात आलेली आहे.

रिजवान कासकर

By

Published : Jul 18, 2019, 8:59 PM IST

मुंबई -अंडरवर्ल्डमध्ये आता काम करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी दाऊदची गँग एखाद्याला फोन करुन धमकी देत असत. मात्र, आता ते व्हॉट्सअॅपवर व्हॉइस रेकॉर्डिंग करुन समोरच्याला धमकावत आहेत. असेच एक प्रकरण मुंबई पोलिसांसमोर आलेले आहे. याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर याला अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडे तक्रार करणारी व्यक्ती आणि आरोपी टॉवेलवाला दोघेही व्यावसायिक पार्टनर होते. हे दोघे चीनवरुन मुंबईत अनधिकृत माल मागवायचे. दोघांमध्ये एक व्यवहार झाला, त्याप्रकरणी तक्रारदाराकडून १५ लाख ५० हजार रुपये उकळण्याचा बेत होता. पैसे उकळण्याचा नादात टॉवेलवाला अहमद वधारियाच्या मार्फत रिझवानकडे गेला. त्याने फईम मचमचशी संपर्क घडवून दिला आणि मचमचने व्यावसायिकाला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून पैसे मागू नये म्हणून धमकावले. यानंतर व्यावसायिकाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रिजवानसह त्याच्या २ साथीदारांना अटक केली. आज त्यांना किला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी हे प्रकरण खंडणीचे नसून सिव्हील मॅटर आहे, असा युक्तिवाद केला.

रिजवान भारतातून दुबईला पळण्याच्या बेतात होता. मात्र, त्याला पोलिसांनी विमानतळावरुन अटक करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलीस वेगळ्या पद्धतीनेही तपास करणार आहे. रिजवानकडे जो बनावट पासपोर्ट सापडला, तो शेख या नावाने बनवण्यात आला आहे. सोबतच अश्फाक टॉवेलवाला याच्याकडे सुद्धा २ बनावट पासपोर्ट सापडल्यामुळे त्यांनी अजून कोणाला खंडणीसाठी धमकावले आहे का, याचा तपास सुरू आहे. या अटकेमुळे पुन्हा एकदा दाऊदची फॅमिली गुन्हेगारी जगतात सक्रिय होत आहे का? याचा तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details