महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्यूआर कोड पद्धतीने प्रभादेवी सिद्धिविनायकाचे दर्शन.. वृद्ध, गर्भवती महिला अन् लहान मुलांना प्रवेश नाही - क्यूआर कोड पद्धतीने प्रभादेवी सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबईमधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकांना मंदिराचे अॅप डाऊनलोड करावे लागणार असून क्यूआर कोड मिळाला तरच दर्शन घेता येणार आहे.

Darshan of Prabhadevi Siddhivinayak
प्रभादेवी सिद्धिविनायकाचे दर्शन

By

Published : Nov 15, 2020, 3:46 PM IST

Updated : Nov 15, 2020, 4:26 PM IST

मुंबई - राज्य सरकारने उद्या (सोमवार) पासून कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिरे आणि प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबईमधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकांना मंदिराचे अॅप डाऊनलोड करावे लागणार असून क्यूआर कोड मिळाला तरच दर्शन घेता येणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर

राज्यात गेले आठ महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. सोमवारपासून मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यासाठी मंदिर प्रशासनाने कोणत्या प्रकारची तयारी केली आहे, याची माहिती देताना बांदेकर बोलत होते.

क्यूआर कोडने दर्शन -
यावेळी बोलताना दिवसभरात सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात 1 हजार भाविकांना तर एका तासात 100 भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. यासाठी भाविकांना सिद्धिविनायक टेम्पल हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. त्यातून बुकिंग केल्यावर एक क्यूआर कोड जनरेट होणार असून दिलेल्या वेळेत हा क्यूआर कोड दाखवून दर्शन घेता येणार आहे असे बांदेकर यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका छापवाले यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेली बातचीत
नियमांचे पालन - राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाबाबत दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. क्यूआर कोड घेऊन येणारा भाविक मंदिराजवळ आल्यावर त्याच्या शरीराचे तापमान पाहिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मास्क असेल तरच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांमध्ये 6 फुटांचे अंतर राखले जाणार आहे. तसेच भाविकांना सध्या प्रसाद विकला जाणार नसला तरी प्रसाद म्हणून सिद्धीविनायकाचा लाडू दिला जाणार असल्याची माहिती बांदेकर यांनी दिली.वृद्धांनी, लहान मुलांनी घरातून दर्शन घ्यावे - लहान मुले, वयोवृद्ध, आजारी असलेली व्यक्ती, तसेच गरोदर महिलांनी मंदिरात येऊ नये. मंदिराच्या अॅपवर ऑनलाइन पद्धतीने दर्शन दिले जाणार असून आरतीही ऑनलाइन पाहता येणार आहे. यामुळे अशा व्यक्तींनी घरात राहून नियमांचे पालन करून सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन बांदेकर यांनी केले आहे.
Last Updated : Nov 15, 2020, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details