मुंबई - विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असताना कलम ३७० वरुन राष्ट्रवादाचे श्रेय घेण्यासाठी शहरात अमित शाहंची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी रोजंदार मजूरांना येथे आणण्यात आले आहे. मात्र, या मजूरांशी चर्चा केली असता त्यांना भाजप, अमित शाह, राष्ट्रवाद आणि जम्मू काश्मीर बद्दल काहीच माहित नसून रविवारचा रोज भरुन काढण्यासाठी हे लोक येथे आल्याचे समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. कलम ३७० संदर्भात गोरेगावच्या नेस्को मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, सभेसाठी मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आणि गोरेगाव परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा परराष्ट्र अध्यक्षांच्या धर्तीवर संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर १००-१०० मीटर अंतरावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. मात्र, या सभेला गर्दी जमवण्यासाठी रोजंदार मजूरांना या ठिकाणी आणण्यात आले. मात्र, या मजुरांशी बातचीत केली असता या लाोकांना भाजप, अमित शाह, राष्ट्रवाद आणि जम्मू कश्मीर बद्दल काहीच माहिती नसून रविवारचा रोज भरुन काढण्यासाठी हे लोक येथे आल्याचे समोर आले आहे.