मुंबई : बनावट ई-पास तयार करून देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. एक हजार रुपयांत ई-पास तयार करून देण्याची जाहिरातही या व्यक्तीने सोशल मीडियातून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा
मुंबई : बनावट ई-पास तयार करून देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. एक हजार रुपयांत ई-पास तयार करून देण्याची जाहिरातही या व्यक्तीने सोशल मीडियातून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा
वैभव विलास दाबेकर (वय 30 वर्षे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध कलम 420, 419, 468, 469, 470, 471, 474, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आळा आहे. त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. राज्यात लॉकडाऊदरम्यान नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात किंवा अन्य राज्यात जाण्यासाठी पोलिसांकडून ई-पास दिला जातो. वैभव आणि त्याच्या साथीदारांनी मात्र बनावट ई-पास बनवायला सुरवात केली होती.
संशयित अर्जामुळे झाला उलगडा
ई-पाससाठी करण्यात आलेला एक अर्ज संशयित असल्याचे चुनाभट्टी पोलिसांच्या निदर्शनास आले होते. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा अर्ज बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत चुनाभट्टीवरून वैभव दाबेकर या व्यक्तीस अटक केली. हा व्यक्ती सोलापुरातील एका व्यक्तीशी संगनमत करून खोटे ई-पास देत होता असे पोलिसांनी सांगितले आहे. एका बनावट ई-पाससाठी तो एक हजार रुपये घेत होता. यापैकी 150 रुपये तो सोलापुरातील साथीदाराला देत होता. याची त्याने फेसबूकवर जाहिरातही केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी फसवणूक केल्याचे उघड झाले असून वैभव दाबेकर याला गुन्हा दाखल करून अटक केल्याचे पोलिसानी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.