महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईतही लॉकडाऊन सुरू आहे. या संधीचा फायदा घेऊन दोन तोतया पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे. या तोतया अधिकाऱ्यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक
फसवणूक

By

Published : May 19, 2021, 7:15 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईतही लॉकडाऊन सुरू आहे. या संधीचा फायदा घेऊन दोन तोतया पोलीस अधिकारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे. या तोतया अधिकाऱ्यांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लुटल्याचे पोलीस तपासात समोर देखील आले आहे.

लॉकडाऊनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसांना बेड्या

कारवाईच्या नावाखाली करायचे लूट

संदीप खोत आणि रमेश मिश्रा हे दोन तोतया अधिकारी मागील अनेक दिवसांपासून दहिसर परिसरात गाडीने फिरायचे. या दरम्यान लॉकडऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना ते अडवून त्यांच्याकडून कारवाईच्या नावाखाली लूट करायचे. समोरच्याला विश्वास बसावा म्हणून या दोघांनी पोलिसांचे बनावट ओळखपत्रही बनवले होते. तर तोंडावरील मास्क देखील महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेला वापरत होते. नुकतीच त्या दोघांनी दहिसरच्या आनंदनगर येथील एका पान टपरीवाल्याला पकडले. लॉकडऊन नियमांचे उल्लघंन केल्याचे सांगत या दोघांनी त्याच्या दुकानातील 70 हजारांची सिगारेट पाकीटे घेतली. ऐवढ्यावरच न थांबता त्याला पकडून जबरदस्ती त्यांच्या गाडीतही बसवले. त्याला काही अंतरावर नेऊन त्याच्याकडून 7 हजार रुपये काढून घेत त्याला सोडले.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा माग
क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांची नाव सांगत विचारपूस केली. त्यावेळी असे कोणीही क्राईम ब्रांच अधिकारी नसल्याचे समोर आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीने दहिसर पोलीस ठाण्यामध्ये या दोन तोतया अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवली. या घटनेची गंभीर दखल घेत दहिसर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे अधिकारी ओम तोटावार यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान या दोघांची ओळख पटल्यानंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर अशाप्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे असल्याचे देखील तपासात समोर आले आहेत.

हेही वाचा -म्यूकरमायकोसिस रूग्णांवर होणार मोफत उपचार, राज्य सरकारने कंबर कसली

ABOUT THE AUTHOR

...view details