मुंबई - दादर पश्चिम येथील जिवादेवाशी निवास मित्र मंडळाच्या दहीहंडीत हिंदू एकता गोविंदा पथकाने 8 थरांचा मनोरा रचत सलामी दिली. त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांतर एकच जल्लोष परिसरात करण्यात आला.
मुंबईत हिंदू एकता गोविंदा पथकाकडून ८ थरांची सलामी - दहीहंडी
मुंबईत यावर्षी दहीहंडीचे आयोजन कमी प्रमाणात असले, तरी गोविंदांचा उत्साह कायम होता. सकाळपासूनच दादर परिसरात गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी केली.
हिंदू एकता गोविंदा पथकाने रचले ८ थर
आज शनिवारी मुंबईत दहीहंडीचे आयोजन कमी प्रमाणात असले, तरी गोविंदांचा उत्साह कायम होता. सकाळपासूनच दादर परिसरात गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी गर्दी केली. दादर पश्चिमेत जीवा देवाशीने आयोजित केलेल्या हंडीमध्ये गोविंदा पथकाने आठ थरांची सलामी देत सर्वांच्याच हृदयाची धडधड वाढविली. दरम्यान, अत्यंत शिस्तप्रिय थर लावत आपल्या खेळाची चिकाटी त्यांनी उपस्थितीना दाखवून दिली.