मुंबई -दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. दहीहंडीचा समावेश खेळांमध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याबाबतचा सरकारी आदेश देखील शिंदे-फडणवीस सरकारने काढला आहे. प्रो-कब्बडी प्रमाणे राज्यात प्रो-दहीहंडी स्पर्धा सुरु केल्या जाणार आहे. गोविदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिलं जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली dahi handi to get status of sport govindas say eknath shinde आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, प्रो-कब्बडी सारखे प्रो-गोविंदा स्पर्धा सुरु करण्यात येतील. दहीहंडी खेळणाऱ्या गोविदांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी नोकरीमध्ये गोविदांना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच, दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.