महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचे सणाच्या आनंदावर विरजण, मुंबईत दहीहंडी उत्सव रद्द... काय आहे गोविंदाचे गाऱ्हाणे?

दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र, राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या एकीमुळं दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा कोरोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. कोरोनामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीतर्फे बुधवारी घेण्यात आला.

Handi
दहीहंडी उत्सवाचे संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 27, 2020, 10:18 PM IST

Updated : Jun 30, 2020, 6:36 PM IST

मुंबई- शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सण आणि उत्सवालाही चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांवर दहिहंडी उत्सव येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरचा ठेवत नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीतर्फे बुधवारी घेण्यात आला.

श्रीकृष्ण जन्मसोहळा (अष्टमीची पूजा) साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सुरक्षित वावराबाबतचे नियम यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोनाचे सणाच्या आनंदावर विरजण, मुंबईत दहीहंडी उत्सव रद्द... काय आहे गोविंदाचे गाऱ्हाणे?

मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र, राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या एकीमुळं दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा कोरोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांचे लक्ष समन्वय समितीच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनामुळे राज्याचे स्वास्थ्य बिघडले असताना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशावेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोऱ्यांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार, असे अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. या खेळाचे आयोजन केल्यास यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे. अनेक अडचणींना तोंड देत हंडी लावणारा गोविंदा मात्र यामुळे निराश झाला आहे, परंतू कोरोनाविरुद्ध लढ्यात तो पण लढत आहे.

Last Updated : Jun 30, 2020, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details