मुंबई मुंबईत दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह Dahi Handi 2022 in Mumbai इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने दहीहंडी हा सण Dahi Handi Festival in Mumbai मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण साजरा करण्यासाठी थर लावताना दुपारी ३ वाजेपर्यंत २४ गोविंदा जखमी 24 Govinda Injured in Mumbai झाले. त्यापैकी १९ गोविंदा वर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर ५ गोविंदा अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
२४ गोविंदा जखमीमुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देवून उंच थर लावून सलामी देणे, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याच दरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत १२ गोविंदा जखमी झाले होते. दुपारी ३ पर्यंत त्यामध्ये वाढ होऊन २४ गोविंदा जखमी झाले. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.