मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांना तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाकारणाऱ्या मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेने केली आहे. छत्रपती संभाजी राजे (Chatrapati Sambhaji Raje) हे मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर भवानी मातेच्या (Tuljapur Bhavani Temple) मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी संभाजी राजे यांना मंदिर प्रशासनाने गाभाऱ्यात प्रवेश करण्यास मनाई केली.
VIDEO : तुळजापूर मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करा - डबेवाला संघटनेची मागणी - तुळजापूर भवानी माता मंदिर उस्मानाबाद
मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांना तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश नाकारणाऱ्या मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेने केली आहे.
Subhash talekar
संभाजी राजे यांना गाभाऱ्यात प्रवेश करण्यापासून मंदिर प्रशासनाने रोखले. यामागे मंदिर व्यवस्थापक नागेश शितोळे हेच जबाबदार आहे. नागेश शितोळे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन जर वर्तन केले असते तर प्रश्न उद्भवला नसता. त्यामुळे नागेश शितोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
हेही वाचा -राज ठाकरे यांना मारण्याची धमकी; बाळा नांदगावकर म्हणाले, ...तर महाराष्ट्र पेटून उठेल