महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cyrus Mistrys Funeral Prossesion : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी वरळीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता - Cyrus Mistrys Funeral will be in Worli

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री Cyrus Mistry यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्यावर उद्या (मंगळवारी) मुंबईतील वरळीत अंत्यसंस्कार Funeral Procession होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Cyrus Mistrys Funeral Procession possibility will be on Tuesday

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री

By

Published : Sep 5, 2022, 12:36 PM IST

Updated : Sep 5, 2022, 3:21 PM IST

मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री Cyrus Mistry यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. काल रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरसच्या कुटुंबातील एकही सदस्य सकाळी रुग्णालयात पोहोचू शकला नाही. सायरस यांचे कुटुंब परदेशात असल्याने ते आज रात्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. सायरस यांच्यावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवली जातCyrus Mistrys Funeral Procession on Tuesdayआहे.


कुटुंबीय परदेशातसायरस मिस्त्री यांचा मुलगा आणि पत्नी फॅमिली फंक्शनसाठी यूकेमध्ये आहेत. आज म्हणजेच सोमवारी ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या वर्षी 28 जून रोजी सायरसचे वडील आणि बिझनेस टायकून पल्लोनजी मिस्त्री (93) यांचेही निधन झाले.


कसा झाला मृत्य?टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते.



कारची फॉरेन्सिक तपासणीअपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय, आहे हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि त्याच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे झाली, याचा शोध घेतला जात आहे. Cyrus Mistrys Funeral Procession possibility will be on Tuesday

हेही वाचाCyrus Mistry: सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन! नातेवाईकांना वापी येथे हलवले

Last Updated : Sep 5, 2022, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details