मुंबईटाटा समुहाचे माजी चेअरमन, उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघर जिल्ह्यातील चिरोटी या ठिकाणी भीषण अपघातात मृत्यू (Cyrus Mistri Accidental Death) झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण उद्योगविश्वावर शोककळा (Mourning the industry) पसरली. अपघातानंतर पार्थिवाचे नवी मुंबई येथील रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे. दरम्यान, पार्थिव नवी मुंबईतून मुंबईत आणण्यासाठी अदानींचे हेलिकॉप्टर (Adani Helicopter) वापरण्यात येणार आहे.
अदानींच्या हेलिकॉप्टरने मुंबईला आणणार पार्थिव(Cyrus Mistry Body Will Be Brought To Mumbai By Adani Helicopter) सायरस मिस्त्रींच्या अपघातानंतर पार्थिवाचे नवी मुंबई येथील रुग्णालयात शवविच्छेदन केले जात आहे. विच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात (body is in the custody of family) दिला जाणार आहे. पार्थिव नवी मुंबई येथून मुंबईत आणण्यासाठी गौतम अदानींच्यां समुहाचे हेलिकॉप्टर वापरले जाणार आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पार्थिव पालघरहून मुंबईला नेले जात असताना त्यांच्या वाहनाची तपासणी केली जात आहे. आम्ही फार काही सांगू शकत नाही. नुकतीच गाडीची तपासणी केली. पुढील तपास सुरू असल्याचे मोटार वाहन निरीक्षक मनीषा मोरे यांनी सांगितले.
उद्योगविश्वातील योगदान1991 मध्ये सायरस यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या प्रमुख बांधकाम कंपनीचे संचालक झाले. त्यांचा भाऊ शापूर यांनी समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायात वाढ केली. वडील संचालक मंडळाचे अध्यक्ष राहिले. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे (Tata Group) सदस्य बनले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा (Chairmanship of the Tata Group) सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. पारंपारिक बांधकामाच्या पलीकडे मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांपर्यत सायरस यांनी मजल मारली. परदेशातही व्यवसाय विस्तारला.
टाटा समूह वादटाटा समूहामध्ये रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यामध्ये वाद (Controversy between Ratan Tata Cyrus Mistry) निर्माण झाल्यामुळे सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून पदावरून काढण्यात आला होतं. मात्र, तरीही त्यांनी आपल्या स्वतःच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केलं. विविध देशांमध्ये त्यांचा बांधकाम, ऊर्जा, अभियांत्रिकी उद्योग विस्तारला. अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय उद्योग जगतात सायरस मिस्त्री दखलपात्र ठरले. आज सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचा अपघाती मृत्यू (Accidental death) झाला.