मुंबई -भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचे नवे चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळवरून मुंबई ते भुवनेश्वर आणि कोलकाता दरम्यानच्या विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये ‘तौते’ चक्रीवादळ धडकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून बचावकार्य करणाऱ्या यंत्रणा सावरल्या नाहीत, तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवीन चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या आज ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.