महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तौक्ते चक्रीवादळ: मुंबईत ताशी ११४ किलोमीटर वेगाने वाहिले वारे - Cyclone Tauktae

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक वार्‍याचा वेग हा कुलाबा परिसरात असणाऱ्या अफगाण चर्च नजीक नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रती तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला. तर दुपारी दोन वाजता च्या सुमारास ११४ किलोमीटर प्रती ‌तास एवढा वेग नोंदविला गेला.

तौक्ते चक्रीवादळ
तौक्ते चक्रीवादळ

By

Published : May 17, 2021, 8:07 PM IST

मुंबई- कोकणासह राज्याच्या काही भागात जोरदार फटका देत हाहाकार माजवणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. सकाळपासून शहर आणि उपनगरांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. या वादळादरम्यान मुंबईमध्ये ताशी ११४ किलोमीटर वेगाने वारे वाहल्याची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

११४ किलोमीटर प्रती ‌तास वाऱ्याची नोंद -


मागील तीन दिवसांपासून कोकण किनाऱ्यावर घोंघावणाऱ्या चक्रीवादळाने सोमवारी मुंबईत धडक दिली. रविवारी रात्रीपासून मुंबईत वारे वाहू लागले होते. आज सोमवारी सकाळी ५ वाजल्यापासून बारीक पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी ८ वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. जोरदार वाऱ्यासह पावसाने रौद्रवतारधारण करीत मुंबईला झोडपायला सुरुवात केली. समुद्रही खवळल्याने उंच लाटा उसळल्या. साडे अकरानंतर वादळासह पावसाचा वेग वाढला. वादळादरम्यान ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुपारनंतर समुद्राला भरती असल्याने ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मुंबईत आज दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रती तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला. तर दुपारी दोन वाजताच्या सुमारास ११४ किलोमीटर प्रती ‌तास एवढा वेग नोंदविला गेला.

वाऱ्याचा परिणाम -


ताशी ११४ किमी वेगाने वाऱ्याचा वेग असल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. ओव्हरहेड वायर पडल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. ताशी ११४ किमीच्या वाऱ्याचा वेग असल्याने ठिकठिकाणी त्याचा फटक बसला. रेल्वे मार्गावर झाडाची फांदी ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने काही वेळासाठी वाहतूक स्थगित करण्यात आली. खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सीलिंकही बंद ठेवण्यात आला होता. वादळी वाऱ्याचा जोर लक्षात घेऊन खबरदारी म्हणून विमान व मोनोरेल सेवाही बंद करण्यात आली होती. दुपारी दोन नंतर काहीवेळ पावसाचा वेग कमी येत असल्याचे चित्र असतानाच दुपारी अडीच-तीन वाजल्यानंतर वादळी-वाऱ्याचा वेग पुन्हा वाढला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सुमारे तीनशेहून अधिक झाडे पडल्याने रस्ते वाहतूक रेंगाळली. पालिकेच्या संबंधित यंत्रणेने ही झाडे हटवून रस्ते मोकळे केले.

पालिकेच्या हवामान केंद्रावर नोंद -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेचे ६० स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत. या केंद्रांवर त्या-त्या ठिकाणी होत असलेल्या पावसाच्या नोंदी सह वाऱ्याच्या वेगाचीही नोंद घेतली जाते. या नोंदीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक वार्‍याचा वेग हा कुलाबा परिसरात असणाऱ्या अफगाण चर्च नजीक नोंदविण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता १११ किलोमीटर प्रती तास एवढा वाऱ्याचा वेग नोंदविण्यात आला. तर दुपारी दोन वाजता च्या सुमारास ११४ किलोमीटर प्रती ‌तास एवढा वेग नोंदविला गेला.

रेल्वेवर झाड कोसळले -
जोरदार वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे लोकल सेवा तात्काळ थांबवण्यात आली. काहीवेळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कोसळलेले झाड दूर केले.

वांद्रे-वरळी सी-लिंक बंद -


वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० वाजल्यानंतर वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.

विमान उड्डाणेही थांबवली -


मुसळधार पाऊस व वाढत जाणारा वाऱ्याचा वेग तसेच ढगाळ वातावरणामुळे मुंबई विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली.

समुद्राला उधाण -


गेटवे, नरीमन पॉईंट, दादर चौपाटी, जूहू येथील समुद्राला उधाण आल्याने उंच लाटा उसळल्या. गेटवे येथील उसळळेल्या लाटा एवढ्या प्रचंड होत्या की तेथील संरक्षण भिंतीला असलेले बॅरिकेड्स उंच लाटेने दूरवर फेकून दिले. खवळलेल्या समुद्रामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.

पहाटेपर्यंत पावसासह वाऱ्याचा वेग राहणार!

रात्री ८ ते ११ पर्यंत तौत्के चक्रीवादळ गुजरातकडे सरकल्याने वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी मुंबईत मंगळवारी पहाटेपर्यंत पावसासह वाऱ्याचा वेग कामय राहणार राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

समुद्राला भरती -
वादळी वाऱ्यासह पाऊस आणि त्यात दुपारी ३.४४ वाजता समुद्राला भरती असल्याने समुद्र लगतच्या भागांना लाटांचा तडाखा बसला. वाऱ्याचा वेग ११४ ताशी ११४ किमी असल्याने प्रचंड लाटा उसळल्या.

हेही वाचा -Cyclone Tauktae : तौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार

ABOUT THE AUTHOR

...view details