दैव बलवत्तर होते म्हणून.. 'तौक्ते' वादळातून सुखरुप बचावलेल्या जहाजातील तरुणांची आपबिती - समुद्रात अडकलेल्या तरुणाची सुखरुप सुटका
अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रसपाटीपासून ७० किलोमीटर अंतरावर जहाजात अडकून पडलो. सुरक्षेसाठी लावलेले जहाजांचे नांगरही तुटल्याने ते हेलकावे खात बुडू लागले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता जीव वाचविण्यासाठी उसाळलेल्या समुद्रात थेट उड्या मारल्या. अखेर २४ तासानंतर भारतीय नौसेना, कोस्ट गार्डच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले. अशी प्रतिक्रिया या वादळातून सुखरुप बचावलेल्या तरुणांनी दिल्या.

मुंबई -अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळामुळे समुद्र खवळला होता. उंचच उंच लाटा उसळत होत्या. समुद्रसपाटीपासून ७० किलोमीटर अंतरावर जहाजात अडकून पडलो. सुरक्षेसाठी लावलेले जहाजांचे नांगरही तुटल्याने ते हेलकावे खात बुडू लागले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता जीव वाचविण्यासाठी उसाळलेल्या समुद्रात थेट उड्या मारल्या. अखेर २४ तासानंतर भारतीय नौसेना, कोस्ट गार्डच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले. दैव बलवत्तर होते म्हणूनच वाचलो, अशी प्रतिक्रिया समुद्रातून सुखरुप बाहेर आलेल्यांनी दिली.
एक रात्र अन् एक दिवस समुद्राच्या पोटात -
तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टींना जोरदार तडाखा देत, गुजरातच्या दिशेने पुढे सरकला. हवामान खात्याने चक्रीवादळाचा तीन ते चार दिवसांपूर्वी इशारा दिला होता. मच्छिमार बांधवांनी नौका किनारपट्टीवर उभ्या केल्या होत्या. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान केले. मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना देखील घडल्या. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जहाज समुद्रात उभे करण्यात आले होते. यातील हिरा ऑईल फिल्डमधील ‘बार्ज पी - 305’ वरच्या जवळपास दिडशे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यातील काही जणांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. एक रात्र एक दिवस समुद्राच्या पोटात होतो. भारतील नौसेना आणि कोस्ट गार्डच्या पथकांने त्यानंतर सुखरुप बाहेर काढले.