महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Live Update निसर्ग चक्रीवादळ : कोकणात आंबा-काजू बागायतदारांना फटका, तर नाशकातही नुकसान

Cyclone Nisarga
निसर्ग चक्रीवादळ

By

Published : Jun 4, 2020, 12:22 AM IST

Updated : Jun 4, 2020, 7:34 PM IST

19:26 June 04

नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला त्यालीत काही महत्वाचे मुद्दे

  • नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या 
  • विशेषत: मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी
  • आपल्या नशिबामुळे चक्रीवादळाचा जोर ओसरला
  • आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल
  • पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला खूप वर्षांनी असे वादळ आले
  • त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारी ठेवावी लागेल

18:56 June 04

नाशिक शहरामध्ये 64 झाडं पडली...दोन घरांचे नुकसान

नाशिक शहरामध्ये 64 झाड पडली

नाशिक 

  • शहरामध्ये 64 झाडं पडली दोन घरांचे नुकसान
  • शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित
  • झाडाखाली अडकलेली एक रुग्णवाहिका आणि चार कार अग्निशमन विभागाच्या जवानांनी काढल्या बाहेर
  • जुने नाशिक भागातील 2 घरांच्या धोकादायक भिंती काही प्रमाणात कोसळल्या
  • चार ठिकाणी शॉर्टसर्किटने किरकोळ आग

17:32 June 04

दिवस ओसरल्यानंतर पावसाने घेतली विश्रांती

दिवस ओसरल्यानंतर पावसाने घेतली विश्रांती

मुंबई

  • दिवस ओसरल्यानंतर पावसाने घेतली विश्रांती
  • मात्र, पाऊस पुन्हा पडण्याची शक्यता
  • पुढील काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहणार
  • आगामी महिन्यांत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
  • निसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही
  • २-३ दिवसांत मान्सून तळकोकणाकडे सक्रिय

पावसाची नोंद

  • वडाळा - 67. 04 मिमी
  • चेंबूर - 50. 3 मिमी
  • वांद्रे- 46.99 मिमी
  • देवनार - 40. 63 मिमी
  • दादर - 44.96 मिमी

17:14 June 04

मुसळधार पावसामुळे वांद्रे खेरवाडी परिसरातील साचले पाणी

वांद्रे खेरवाडी परिसरातील साचले पाणी

मुंबई 

  • आज सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वांद्रे खेरवाडी परिसरातील साचले पाणी
  • पाऊस थांबला तरी सखल भागातील पाण्याचा निचरा नाही
  • या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना पाण्यातूनच वाट काढत मार्गक्रमण करण्याची वेळ

17:06 June 04

खासदार सुनील तटकरे यांनी ईटीव्ही भारतशी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेली बातचित

खासदार सुनील तटकरे

खासदार सुनील तटकरे यांनी ईटीव्ही भारतशी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बातचित केली त्यातील महत्वाचे मुद्दे

  • वादळामुळे मोठे नुकसान
  • पश्चिम बंगालच्या पॅकेज प्रमाणे केंद्र सरकारने पॅकेज द्यावे
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी
  • मोबाईलवर फोटो काढूनही (त्यावर तारीख आणि वेळ येत असल्याने) नुकसान भरपाई द्यावी
  • पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडून नुकसानीची पाहणी
  • शरद पवारही पाहणी दौरा करण्याची शक्यता

16:34 June 04

चक्रीवादळात पुण्यातील फळबागा उध्वस्त... लाखोंचे नुकसान

चक्रीवादळात पुण्यातील फळबागा उध्वस्त...

पुणे

  • जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना
  • जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हा, भोर, मावळ, आंबेगाव, पुरंदर, दौंड तालुक्यात शेत पिकांचे नुकसान
  • वाघोली येथील शेतकरी राजेंद्र शितोळे यांच्या शेतातील केळी आणि पपईच्या बागांचे मोठे नुकसान
  • आंब्याच्या बागेचेही जिल्ह्यात नुकसान

16:24 June 04

पुण्यात नुकसानीचे आजपासून तातडीने पंचनामे

महसूल विभागाकडून आजपासून तातडीने पंचनामे

पुणे

  • निसर्ग चक्रीवादळाचे शेतीसह शेतीजोडव्यवसायाचे मोठे नुकसान
  • उभी पिके जमीनदोस्त तर घरांचे आणि जनावरांच्या गोटे भुईसपाट
  • महसूल विभागाकडून आजपासून तातडीने पंचनामे

16:07 June 04

सिंधुदुर्गमध्ये वादळाचा तडाखा... अनेक घरांचे नुकसान

सिंधुदुर्ग

  • निसर्ग चक्रीवादळाचा सिंधुदुर्गतही फटका
  • जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांवर पडली झाडे
  • 24 तासांत जिल्ह्यात 71.87 मिमीच्या सरासरीने एकूण 575 मिमी पावसाची नोंद
  • मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मिमी पाऊस
  • तर वैभववाडी तालुक्यात सर्वात कमी 24 मिमी पाऊस
  • जिल्ह्यात खासगी मालमत्तेची लाखोंची हानी
  • नुकसानीचे पंचनामे सुरू

15:57 June 04

वादळाच्या तडाख्यात ठाण्यातील स्मशानभूमी कोसळली

वादळाच्या तडाख्यात ठाण्यातील स्मशानभूमी कोसळली

ठाणे

  • निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्यात स्मशानभूमी
  • भिवंडी तालुक्यातील सांगे गावात सकाळच्या सुमारास घडली घटना
  • अंतविधी उघड्यावर करण्याची वेळ

15:48 June 04

म्हसळा तालुक्यात चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

म्हसळा तालुक्यात चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा

रायगड

  • म्हसळा तालुक्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
  • घरे, इमारतींवरील छप्पर उडाले, घरांवर झाडे कोसळली, रस्ते बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत
  • लाखो रुपयांची वित्तहानी

15:39 June 04

बीकेसी कोविड सेंटरचे आतून नुकसान झालेले नाही.. महापालिकेचा खुलासा

बीकेसी कोविड सेंटरचे आतून नुकसान झालेले नाही
  • निसर्ग चक्रीवादळाचा फटका बीकेसीतील कोविड सेंटरला बसला नाही.
  • आतील बाजूने कोणतेही नुकसान झालेले नाही.
  • आज संध्याकाळपासूनच हे सेंटर रुग्णसेवेत दाखल होईल.

15:28 June 04

4 जूनचे हवामान...

आजचे हवामान..

15:15 June 04

रायगडमध्ये दोघांचा मृत्यू

रायगड  

  • अलिबाग तालुक्यातील उमटेमध्ये वीजवाहक खांब अंगावर कोसळून एकाचा मृत्यू
  • श्रीवर्धनमध्ये भिंत कोसळून दशरथ वाघमारे (वय 58) यांचा मृत्यू

14:52 June 04

मुंबईत पावसाची दमदार हजेरी... मालाड सबवेत पंप बसवूनही साचले पाणी

मालाड सबवेत पंप बसवूनही साचले पाणी

मुंबई- मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईमध्ये रेड अलर्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पावसाने मुंबई उपनगरातील मालाड सबवेमध्ये पाणी साचलेल्याचे पाहायला मिळाले.

14:51 June 04

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका.. 5 जण जखमी, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका

रत्नागिरी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांनी झाडे मुळापासून उन्मळून घरांवर कोसळली. झाडे कोसळल्याने रत्नागिरी तालुक्यात पाच जण जखमी झाले. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत होता. रत्नागिरी तालुक्यातील शहर तसेच अनेक गावेही समुद्र किनाऱ्यानजिक आहेत. त्यामुळे वेगवान वार्‍यांनी कुणाच्या घराचे, शेडचे तर कुणाच्या गोठ्यांचे छत उडाले.

14:49 June 04

रत्नागिरीत बागायतदारांचे मोठे नुकसान

रत्नागिरी- जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका दापोली, मंडणगडमध्ये बसला आहे. दापोलीत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरांवर झाडे कोसळली आहेत. तर बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, पोफळी आणि फणसाची हजारो झाडे या वादळात भुईसपाट झाली आहेत.

13:26 June 04

मुंबईत सखल भागात साचले पावसाचे पाणी

मुंबईतील सखल भागाचा आढावा देताना प्रतिनिधी

मुंबईत आज (दि. 4 जून) सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईमध्ये रेड अलर्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. किंग्स सर्कल या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मात्र, याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 

13:23 June 04

ठाण्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस

ठाण्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस

ठाण्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी फ्लॉवर वेली आणि मुख्य बाजार पेठेतील विठ्ठल मंदिर परिसरातील अनेक झाडे पडली. वेली येथे झाड पडल्याने एका चारचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

12:48 June 04

मुंबईसह कोकणात मुसळधार, रायगडच्या ऐरोलीत 60.8 मिमी पावसाची नोंद

निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होत असून सर्वाधिक पावसाची नोंद घणसोली 70.4 मिमी इतकी झाली आहे.

पावसाच्या नोंदी खालीलप्रमाणे

मुंबई

सांताक्रुझ - 32.2 मिमी, कुलाबा - 45.4 मिमी, वांद्रे - 30.9 मिमी, अंधेरी - 21 मिमी, वरळी - 46 मिमी, दादर - 42 मिमी, वडाळा - 59 मिमी, धारावी - 40 मिमी इतक्या पवसाची नोंद झाली आहे.  

रायगड

वाशी - 41 मिमी, खैरना - 57.4 मिमी, ऐरोली - 60.8 मिमी तर घणसोलीमध्ये 70.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

12:31 June 04

अलिबागमध्ये एनडीआरएफचे मदतकार्य सुरू, रस्ते वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य

अलिबामधील रस्त्यावरील झाडे हटवताना एनडीआरएफचे जवान

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर झाडे पडली आहेत. ते झाडे एनडीआरएफच्या पथकाकडून हटविले जात आहे.

12:25 June 04

वादळी वाऱ्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरातील शंभर वर्षे जुना वाडा कोसळला

नाशकात कोसळलेला वाडा

वादळी वाऱ्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरातील पिंपळ चौकातील शंभर वर्षे जुना वाडा कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. वाड्याखाली उभ्या असलेल्या एका वाहनाचे नुकसान झाले आहे. वाडा जुना असल्यामुळे तो महापालिका प्रशासनाकडून अगोदरच रिकामा करण्यात आला होता.

12:04 June 04

दापोलीत नारळ, आंब्याच्या बागा झाल्या उद्ध्वस्त; बागायतदारांचे मोठे नुकसान

उन्मळून पडलेले झाड

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा फटका दापोली, मंडणगड तालुक्याला बसला आहे. दापोलीत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी नारळ, आंबा आणि फणसाची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

10:36 June 04

रत्नागिरीत एनडीआरएफचे मदत कार्य सुरू

मंडणगड येथील पडलेले झाड हटवताना एनडीआरएफचा जवान

रत्नागिरीतील मंडणगड येथे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. एनडीआरएफचे जवान ही झाडे हटवत आहेत. 

10:16 June 04

वसई विरारमध्ये जोरदार पाऊस

वसई-विरारमध्ये आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वसईमध्ये 22 मिमी, माणिकपूर 24 मिमी, मांडवी 24 मिमी, विरार 26 मिमी, निर्मळ 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कालपासून (दि.3 जून) सुरू असेल्या विजेच्या लपंडावाने वीजग्राहक हैराण झाले असून विरार, कोपरी, चंदनसार येथील वीज गायब झाली आहे.

09:36 June 04

अमरावती जिल्ह्यात मुसळधार

विदर्भाच्या नंदनवनात मुसळधार पाऊस सुरू असून चिखलदरा येथे धुक्याची चादर पसरली आहे.

09:33 June 04

एनडीआरएफकडून मदतकार्य सुरु

एनडीआरएफची 21 पथके महाराष्ट्रात कार्यरत असून त्यापैकी एक राखीव आहे. या पथकाकडून मदतीचे काम सुरू आहे.

09:30 June 04

नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात शहरातील पावसाने पूर

नाशकात मुसळधार

निसर्ग चक्रीवादळानंतर नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. शहरातील ओढे आणि नाल्यांच्या पण्याने गंगेला पूर आला असून रामकुंड आणि लक्ष्ण कुंड पाण्याखाली गेले असून गांधी तलावही ओसंडून वाहत आहे.

06:17 June 04

निसर्ग चक्रीवादळ; कळंबोली पोलीस ठाण्याच्या इमारतीवर पडले झाड

पोलीस ठाण्यावर पडलेले झाड

नवी मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाहाकार उडाला. यामध्ये इमारतीवरील पत्रे उडाली, वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बंद पडला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात आज झालेल्या वादळामुळे महाकाय वृक्ष पोलीस ठाण्याच्या इमारतीवर कोसळून मोठे नुकसान झाले.

06:13 June 04

निसर्ग चक्री वादळाचा धोका टळला; नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

नागरिक

पालघर- अरबी समुद्रात निर्माण झालेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण, मुंबईसह पालघर जिल्ह्याला देखील बसण्याची शक्यता होती. हे चक्रीवादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकले व त्यानंतर वादळाने उत्तर महाराष्ट्राकडे कूच केल्याने पालघरच्या किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम फारसा जाणवला नाही. त्यामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चक्रीवादळाचा धोका जरी टळला असला, तरीही पावसाचा अंदाज मात्र कायम आहे. त्यामुळे अजूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

03:56 June 04

निसर्ग' चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला फटका; दोघांचा मृत्यू, अनेक घरांचे नुकसान

फळबागांचे झालेले नुकसान

पुणे - अनेक तालुक्यांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. या वादळामुळे खेड आणि हवेली तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. हवेली तालुक्यातील मोकरवाडी येथील प्रकाश किशन मोकर (वय 52) आणि खेड तालुक्यातील वहागाव येथील मंजाबाई अनंत नवले (65) या दोघांचा मृत्यू झाला. तर वहागाव येथील तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याशिवाय, जुन्नर, खेड, मुळशी, वेल्हा, भोर, मावळ, आंबेगाव, पुरंदर, दौंड या तालुक्यातील घरांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. 

02:12 June 04

निसर्ग चक्रीवादळ; फळबागांना तडाखा, जुन्नरचा आंबा, केळी बागा भुईसपाट

फळबागांचे झालेले नुकसान

पुणे- जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून केळी, आंबा बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली फळे भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

बुधवारी दुपारपासून सह्याद्रीच्या पर्वत रांगातून चक्रीवादळ खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात धडकले. चक्रीवादळासह पावसाच्या सरी सुरु झाल्या. यामध्ये शेतमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन केळी व आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.  

हा आंबा कोकणातला आंबा हंगाम संपल्यावर मुंबई मार्केटला विक्रीसाठी पाठवला जातो. या फळबागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतल्याने शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

01:47 June 04

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानाने वीजयंत्रणेचे मोठे नुकसान, पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात बत्तीगूल

पुणे - जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.

पुणे शहरात वादळी पावसामुळे 85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे.

00:06 June 04

निसर्ग चक्रीवादळ; मुसळधार पावसाने नाशिक, पुण्याला झोडपले

मुंबई- निसर्ग चक्रीवादळाचा किनारी भागाला असलेला धोका टळला आहे. मात्र या चक्रीवादळामुळे आता उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिक परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भासह मध्यप्रदेशात आता चक्रीवादळ घोंगावणार आहे.  

Last Updated : Jun 4, 2020, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details