मुंबई - हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे. मात्र, या पावसाचा फटका मुंबईची लाईफ लाईन अर्थात मुंबई लोकलला सहन करावा लागतोय. मुंबईत बुधवारपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचे पायला मिळाले.
मनस्तापाचा सामना प्रवाशांना सहन करावा लागतोय
पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे देखील उशीराने धावत आहेत. यात बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धावणाऱ्या सर्व जलद गाड्या जवळपास पावूण तास उशीराने धावत आहेत. यामुळे स्लोक ट्रॅकवरच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे पायला मिळाले. आज सकाळी (१०. २०) नंतर बोरिवली रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या सर्व जलद लोकल जवळपास अर्धा ते पाऊण तास उशारीने धावत असल्याचे पायला मिळाले. वांद्रा स्थानकातून (१०.५४) ला सुटणारी चर्चेगेट फास्ट लोकल आज (११. २०) होऊन गेले तरी वांद्रे स्थानकावर पोहचली नव्हती. या मनस्तापाचा सामना प्रवाशांना सहन करावा लागतोय.