मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने महिला सुरक्षेच्या जनजागृतीसाठी तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने औरंगाबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणी शशिकांत जाधव या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.
अश्लील कमेंट करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी केली अटक, बॉलिवूड अभिनेत्रीला दिला होता त्रास - Cyber police arrest accused
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने औरंगाबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणी शशिकांत जाधव या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती उपक्रम राबविले जातात. त्याला अनुसरूनच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या इंस्टाग्रामवर महिला सुरक्षा जनजागृती या संदर्भात एक व्हिडीओ अपलोड केलेला होता.
या व्हिडिओवर अटक करण्यात आलेला आरोपी शशिकांत जाधव याने अर्वाच्च भाषेत कमेंट केली होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली होती. त्यानंतर सायबर विभागाने केलेल्या तपासाअंती औरंगाबाद येथून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.