मुंबई -राज्यात सायबर गुन्ह्यात Cyber Crime Capital प्रचंड वाढ होत आहे. त्यांचे केन्द्र नेपाळमध्ये Cyber Crime Capital In Nepal असून, असे गुन्हे मोडीत काढण्याच्या उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती विधान परिषद सभागृह नेते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांनी दिली. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यानी सायबर गुन्हाबाबत Cyber Crime आज परिषदेत लक्षवेधी मांडून सभागृहात याप्रश्नी आवाज उठवला.
ज्येष्ठ नागरिकांना केले जाते लक्ष्यराज्यात सायबर गुन्ह्यात Cyber Crime Increase In Mumbai प्रचंड वाढ झालेली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जाते. गेल्या पाच महिन्यात राज्यात नोंदविलेल्या सायबर गुन्ह्यांची आकडेवारी पाहता ऑनलाईन बँकिंग Online Banking फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. केवायसी विचारली जाते, ओटीपी मिळविली जाते आणि कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली जाते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक त्या बतावणीत फसतात आणि त्यांचे बँक अकाऊंट खाली होते. मागील वर्षभरात राज्यात 2,883 सायबर गुन्ह्यांची Cyber Crime नोंद झाली. मात्र त्यापैकी अवघ्या 455 गुन्ह्यांची उकल झाली. सायबर गुन्ह्यात होत असलेली वाढ रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मनीषा कायंदे यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील, राजहंस सिंह, सचिन अहिर यांनीही कायंदे यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत, सायबर गुन्ह्यांचा पाढा वाचला.
नेपाळमधून चालतात अॅपगृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले की, सायबर गुन्ह्याचे Cyber Crime काही अॅप नेपाळमधून चालतात. फोनही तेथून येतात. या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकांना आकृष्ठ केले जाते. फोन करून ते सांगतील त्याप्रमाणे पैसे भरल्यानंतर ते पैसे गायब होतात. ते पैसे त्यांच्या वॅलेटमध्ये जमा होतात. यात मॅट्रिमोनियल साईटच्या Matrimonial site मार्फत अनेक गुन्हे होतात. राज्यात जुलै 2022 अखेर 4848 सायबर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 636 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या प्रकरणात 652 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ऑनलॉईन बँकिंग Online Banking Fraud फसवणुकीचे 2101 गुन्हे दाखल झाले आहेत. यात 75 गुन्ह्यांची उकल झाली असून 61 जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यात झालेली वाढ आणि सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यात Cyber Crime वाढ झाल्याचे फडणवीस म्हणाले.
गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सुरू केल्या आहेत 34 लॅबसायबर गुन्ह्यांचा Cyber Crime तपास करणारी यंत्रणा असलेली एमएमआरएडीची इमारत पीडब्यूडीच्या ताब्यात असली, तरी ती एमएमआरडीएला दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी 34 लॅब सुरू केल्या आहेत. त्यासाठी मनुष्यबळ प्रगत करण्यात येत आहे. टेक्नॉलॉजी दरवर्षी अपग्रेड होते. मात्र माणसे अपग्रेड होत नाहीत. त्यासाठी प्रशिक्षित माणसे भरण्यात येत आहेत. यासाठी मॅसिव्ह कँपेन करणार आहोत. सायबर गुन्ह्यात Cyber Crime सामान्य माणसे फसली जाऊ नयेत, म्हणून केंद्र सरकारने व्यवस्था केलेली आहे. आपण त्यात जोडले गेलो आहोत. संभाव्य सायबर गुन्हे Cyber Crime टाळण्यासाठी सोशल मीडियाद्वारेदेखील सामान्य नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात असल्याचे देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले.
हेही वाचा Maharashtra Bullet Train Fund बुलेट ट्रेनसाठी कोट्यवधीची तरतूद करुन सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल