मुंबईमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेला ५०० ग्रॅम कोकेनसह डीआरआयने महसूल गुप्तचर संचालनालय अटक केली आहे. इथोपियन एअरलाइन्सने ही महिला मुंबईत दाखल झाली होती. या कोकेनची किंमत 5 कोटी इतकी आहे.
कस्टम्स विभागाची कारवाईकस्टम्स विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ही कारवाई केली आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या AIU अधिकार्यांनी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमन हॉलजवळ परदेशी महिला बिंटू जानेह हिला रोखलं होत. ही महिला इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा ते मुंबई असा प्रवास करत होती. तिच्या बॅगमध्ये कोकेन लपवलेले होते. हे कोकेन मुंबईतील एका व्यक्तीला द्यायचं होतं. तिच्या हँडबॅगमध्ये 500 ग्रॅम कोकेन सापडल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे.