महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

20 Crore Heroin Seized : मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई.. २० कोटींचे हेरॉईन जप्त - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. दोन परदेशी महिलांच्या ताब्यातून तब्बल २० कोटी रुपयांचे ४ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले ( Custom Department Seized 20 Crore Heroin ) आहे.

हेरॉईन
हेरॉईन

By

Published : Jan 21, 2022, 5:51 PM IST

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) कस्टम विभागानं मोठी कारवाई करत दोन परदेशी महिलांना अटक केली आहे. विमानतळावर संबंधित महिलांकडे 20 कोटी रुपयांचं 4 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं ( Custom Department Seized 20 Crore Heroin )आहे. अटक केलेल्या महिलांकडे युगांडाचा पासपोर्ट आढळून आला आहे. अटक केलेल्या महिलांची नावं क्यांगेरा फातुमा आणि तिची मुलगी मान्सिम्बे जयानाह अशी आहेत. त्यांनी जुबा (सुदान) ते दुबई आणि दुबईवरुन मुंबई असा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांना न्यायालयीन कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर २० कोटी किंमतीचे ४ किलो हेरॉइन ड्रग्ज जप्त केलं आहे. ज्या महिलांकडे ड्रग्ज आढळून आलं त्यांच्याकडे युगांडाचा पासपोर्ट आढळला आहे. या प्रकरणी कस्टम विभागानं मुंबई विमानतळावर या महिलांना अटक केल्यांनतर न्यायालयात हजर केले. न्यायालयानं या आरोपी महिलांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details