मुंबई -सोशल मीडियावर नुपूर शर्माना पाठिंबा दर्शविणारी पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री उमेश कोल्हे यांचा गळा चिरून हत्या करण्यात आला होती. ( Amravati Umesh Kolhe Murder Case ) दरम्यान, या प्रकरणी त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने तो तपास एनआयएकडे सोपला होता. पुढे 4 जुलै रोजी अमरावती न्यायालयात अर्ज दाखल करून एनआयएने सातही आरोपींचा ताबा मागितला होता. त्यानुसार सर्वांना चार दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला.
सर्व बाबींचा तपशील घेण्यात आला - यापूर्वी अमरावतीचे मेडिकल दुकान मालक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक बुधवारी पुन्हा एकदा दोन आरोपींसह अमरावतीत पोहोचले होते. या आरोपींकडून स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यात आले. आरोपी कुठे गेले काय केले या सर्व बाबींचा तपशील घेण्यात आला. दोन्ही आरोपींच्या माहितीच्या आधारे अमरावतीच्या घंटाघरवली गल्लीत गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे.
Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्याकांडतील आरोपींच्या कोठडीत वाढ
अमरावती उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील अटकेतील सर्व आरोपींना 22 जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. ( Umesh Kolhe Murder Case ) आज शुक्रवार (दि. 15 जुलै)रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आज या सर्व आरोपींची एनआयए कोठडी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्यांची पुन्हा एनआय कोठडीत रवानगी केली आहे.
फाईल फोटो
मौलाना आझाद नगर येथील रहिवासी आहे - एनआयएचे पथक बुधवारी अमरावतीत पोहोचलेल्या दोन आरोपींची नावे शेख तौफिक उर्फ नानू शेख तस्लीम आणि अतिब रशीब आदिल रश्दी अशी आहेत. तौफिकचे वय 24 वर्षे असून तो बिस्मिला नगर लालखडी येथील रहिवासी आहे. अतीब रशीदचे वय 22 असून तो मौलाना आझाद नगर येथील रहिवासी आहे. या दोन्ही आरोपींनी उमेश कोल्हेची रेकी केली होती.
हेही वाचा -Matoshri Doors: मातोश्रीचे दरवाजे आधी उघडले असते तर ही वेळ आली नसती -देवेंद्र फडणवीस