मुंबई - कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपोयजना आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमी मुंबईत नाईट कर्फ्य़ू लागू करण्यात आला आहे. मात्र, नव वर्षाच्या शुभेच्छा देणे गाठी भेठी घेणे याचा सारख्या लहान सहान गोष्टीसाठी मुंबई पोलिसांकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला होता. यासाठी मुंबई पोलिसांनी ५ पेक्षा कमी लोकांना रात्री ११ नंतर बाहेर पडण्यास मुभा दिली होती. मुंबई पोलीस दलाचे कायदा आणि सुवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस आय़ुक्त विश्वास नागरे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
ऑपरेशन ऑल ऑऊट-
रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत सुरू असलेल्या या कर्फ्यूच्या काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून ३१ डिंसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबई पोलिसांनी शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले. यामध्ये अवैध दारू, अमली पदार्थ सेवन, ड्रंक अँड ड्राईव्ह अशा गुन्ह्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच मुंबईकरांना दिलेल्या सुविधेबाबत बोलताना पाटील म्हणाले की, मुंबईकरांनो कर्फ्यू आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी लावण्यात आला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून नव वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा कमी व्यक्ती ११ नंतरही घराबाहेर पडू शकतात, असेही त्यांनी गुरुवारी रात्री स्पष्ट केले.
नियम मोडणाऱ्यावर कारवाई-
शहरातील कायदा व सुवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. नाईट कर्फ्यू अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी , रात्री 11 नंतर बार आणि पबवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यावर कारवाई निश्चितच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पाटील यांनी ३१ डिंसेंबरच्या रात्री मुंबई शहरातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.