मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर पालिका कारवाई करत आहे. (BMC issues notice to Narayan Rane) त्यासाठी त्यांच्या बंगल्याचे मोजमाप घेतले जात आहे. राणे यांच्या बंगल्यात CRZ नियमांचे उल्लंघन झाले आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
CRZ नियमांचे उल्लंघन -
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून कोविड काळात ज्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना त्याचे सरकारी मदत मिळाली नाही अशा लोकांची सुनावणी घेतली जात आहे. (Union Minister Narayan Rane ) यावेळी बोलताना राणे यांच्या बंगल्यात CRZ नियमांचे उल्लंघन झाले आहे. दरम्यान, बीएमसीला राणे सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करत बीएमसी आपले काम करणार आहे. विरोधकांनी उगाच बिनबुडाचे आरोप करू नये असे आवाहन महापौरांनी केले आहे.
ऑन महिला आयोग तक्रार -
सुशांत सिंग याची मॅनेजर दिशा सालीयन हिच्या मृत्यूनंतरही बदनामी केली जात आहे. या प्रकरणात महिला आयोगाला मी तक्रारीचा मेल करणार आहे असही त्या म्हणाल्या आहेत. (Coastal Regulation Zone) दरम्यान, महिला आयोगाला सांगायचीही नाही. महिला आयोग योग्य ती कारवाई करेल असे महापौर म्हणाल्या.
हिंदू मुस्लिम वाद निर्माण करू नका -
भाजपाच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी पालिका शाळांमध्ये गीता पठण करावे अशी ठरावाची सूचना मांडली आहे. यावर बोलताना, गीता पठणचा प्रस्ताव आम्हाला अद्याप आलेला नाही. लहान मुलांमध्येम्ही राजकारण आणणार का? असा प्रश्न उपस्थित करत कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण करू नका असे आवाहन महापौरांनी केले आहे.
तोपर्यंत मास्क घालवाच लागेल -
मास्क मुक्तीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मास्क घालावाच लागेल. 100 टक्के आपण मास्क मुक्तीबाबत निर्णय घेणार आहोत. मार्चमध्ये यावर सविस्तर आढावा घेतला जाईल असही त्या म्हणाल्या आहेत. राज्यात, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नगण्य झाली तर नक्कीच आपण मास्कमुक्ती बाबत विचार करू असही महापौर म्हणाल्या आहेत.
हेही वाचा -Prabhas Treats Big B : ''बच्चन झाले प्रसन्न''!! प्रभासने बिग बीसाठी आणले स्वादिष्ठ घरगुती जेवण