महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cruise Drugs Party Case : आर्यन खान, अरबाज आणि मुनमुनने लावली एनसीबी कार्यालयात हजेरी

क्रुझ ड्रग प्रकरणात (Cruise Drugs Party Case) जामीन देताना आर्यन खान (Aryan Khan), अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना न्यायालयाने काही अटीवर जामीन दिला होता. दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज (शुक्रवारी) हजेरी लावली.

Aryan Khan appeared at the NCB office
आर्यन खान

By

Published : Nov 19, 2021, 5:50 PM IST

Updated : Nov 19, 2021, 7:25 PM IST

मुंबई -क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party Case) केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंदवण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर NCB कार्यालयात हजर राहण्याची ही तिसरी वेळ आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा (Moonmoon Dhamecha) हे सुद्धा आज हजेरी लावायला आले होते.

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी -

क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज (शुक्रवारी) हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

नेमके काय आहे प्रकरण?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबरला एनसीबीने क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानची ३० ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

हेही वाचा -शेतकऱ्यांच्या संघर्षाला 'सलाम'; कृषी कायदे रद्द केल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated : Nov 19, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details