मुंबई -मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते नोव्हेंबर, २०२१ या कालावधीमध्ये रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरात हरविलेल्या, घर सोडून आलेल्या, रस्त्या चुकलेल्या ८६४ मुलांची घरवापसी करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. ज्यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर गेल्या महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा भेट करून देण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा बलाला यश -
बाहेरील राज्यातील मुलांना मुंबईचे आकर्षण असल्याने अनेक मुले आपले घर सोडून रेल्वेने मुंबई गाठतात. याचबरोबर रेल्वे परिसरात हरविलेल्या, रस्त्या चुकलेल्या मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर, २०२१ या कालावधीमध्ये अशा प्रकारे पळून आलेल्या ८६४ मुलांची घरवापसी केली आहे. या मुलांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेत पुन्हा त्यांच्या राहत्या घरी सोडण्यात आले आहे. अनोळखी शहरात हरविल्याने गोंधळलेल्या मुलांची समजूत काढून त्यांना घरी सोडण्यात येते. काही मुले पालकांच्या निष्काळजीपणामुळे लहान मुले हरवतात, तर काही वेळेला मुलांचे अपहरण केले जाते. अशा मुलांना मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने शोध घेऊन त्यांची घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर नोव्हेंबर-२०२१ महिन्यात ५० मुले आणि २९ मुलींसह एकूण ७९ मुलांची सुटका करण्यात आली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत पुन्हा एकत्र करण्यात आले. हरवलेल्या किंवा घर सोडून आलेल्या मुलांमध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे.
आरपीएफ जवानांचे कौतूक -