महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मिनी लॉकडाऊनमध्येही मुंबईतील वाईन शॉपसमोर मद्यपींची गर्दी - Crowds of people at the wine shop

राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान सुद्धा दारूच्या दुकानासमोरील गर्दी ही अद्याप कमी झालेली नाही. मुंबईमधील चेंबूर परिसरामधील चेंबूर नाका येथील एका दारूच्या दुकानासमोर लोकांनी आज दारू घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले.

mumbai liquer shops
mumbai liquer shops

By

Published : Apr 10, 2021, 5:25 PM IST

Updated : Apr 10, 2021, 5:36 PM IST

मुंबई -मुंबईसह महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन महाराष्ट्रात 50 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्येची भर पडत आहे. त्यामुळे राज्य सरकार चिंतेत असून मागील एका आठवड्यापासून राज्यात कोरोनावर आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून लोकांनी याचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने जनतेला दिल्या आहेत. आज व उद्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाऊनची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा दारूच्या दुकानासमोरील गर्दी ही अद्याप कमी झालेली नाही. मुंबईमधील चेंबूर परिसरामधील चेंबूर नाका येथील एका दारूच्या दुकानासमोर लोकांनी आज दारू घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं.

मुंबईतील वाईन शॉपसमोर मद्यपींची गर्दी
राज्यात पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा दारूच्या दुकाना समोरील लोकांची गर्दी ही कमी झालेली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने ऑनलाइन पद्धतीने दारू विक्री करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु तो निर्णय सुद्धा फोल ठरला आणि दारूच्या दुकाना समोरील गर्दी जैसे थे पाहायला मिळत होती. यावेळेस मिनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळाले. ऑनलाइन दारू विक्री जरी सुरू असली तरी लोक घराबाहेर पडून दारूच्या दुकानांसमोर रांगा लावून दारू घेण्यासाठी उभे असल्याचे चित्र आज दुपारी चेंबूर नाका परिसरामधील एका वाईन शॉप मध्ये पहायला मिळाले. त्या दुकानांसमोर लोकांनी गर्दी केली होती पण जेव्हा स्थानिक पोलीस आले त्यावेळेस तेथील गर्दी ही नाहीशी झाली आणि पुन्हा पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा तिथे लोक जमले.
एकीकडे राज्यात कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे आणि दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये लोकांनी नियम न पाळता घराबाहेर पडून दारूच्या दुकानासमोर गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रशासनाने दारूची दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. तो निर्णय आर्थिकदृष्ट्या सरकारने घेतलेला असल्यामुळे त्याचा फायदा सरकारला झाला. परंतु या दोन दिवसीय लॉकडाऊनमध्ये लोकांनी दारूच्या दुकानात बाहेर रांग लावून दारू विकत घेणे हे कोरोनाच्या या महाभयंकर स्थितीमध्ये कितपत योग्य आहे, हे लोकांनीच विचार करणे आता खरं तर गरजेचे आहे, अशी परिस्थिती आपल्यासमोर निर्माण झालेली आहे.
Last Updated : Apr 10, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details