मुंबई -आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक अनियमिततेमुळे सहा महिने निर्बंध लावले आहेत. यादरम्यान खातेधारकांच्या रोषासमोर आरबीआयने काहीसा दिलासा दिला आहे. यानंतर दहा हजारांची रक्कम काढण्यासाठी खातेदारांची पीएमसी बँकेच्या सर्व शाखांच्या बाहेर लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहेत. भांडुप पश्चिम मधील बँकेच्या मध्यवर्ती शाखेवर खातेदारांनी दहा हजार रुपये काढण्याकरता मोठी गर्दी केली.
दहा हजार रुपयांसाठी पीएमसी खातेदारांची भांडुपच्या शाखेबाहेर गर्दी - पीएमसी बँक आर्थिक निर्बंध प्रकरण
आरबीआयने पीएमसी बँकेच्या खातेदाराना १०,००० काढण्याच दिलासा दिल्यानंतर भांडुप पश्चिमच्या बँक शाखेबाहेर मोठी गर्दी खातेदारानी केली होती. घटस्थापनेच्या दिवशी देखील बँकांच्या बाहर रांगा लावून लोक उभे होते.
पीएमसी खातेदाराची भांडुपच्या शाखेबाहेर गर्दी
पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे खातेदार घटस्थापनेच्या दिवशी देखील बँकांच्या बाहेर रांगा लावून दहा हजार रुपये काढण्यासाठी उभे होते. ऐन सणासुदीच्या दिवसात खातेधारकांवर हे आर्थिक संकट ओढवल्यामुळे खातेदार आता आमचा पैसा आता कुठे सुरक्षित असणार असा सवाल करत आहेत.