मुंबई- वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. भाविकांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. सायन दादर, शिवडी, काळाचौकी, लालबाग, परळ, ना.म.जोशी मार्ग तसेच कॉटनग्रीन या ठिकाणाहून आलेल्या वारकऱ्यांनी मृदुंगाच्या तालावर ताल धरला. आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपुरात पायी जाता आले नाही, म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रतिपंढरपुरात म्हणजेच वडाळातील विठ्ठल मंदिरात एकच गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईतील प्रतिपंढरपूरात भाविकांची गर्दी; वडाळ्यातील मंदिरात लागल्या भक्तांच्या रांगा
मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर येथे शनिवारी पहाटेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये राजकीय नेते व अभिनेत्यांनी दर्शन घेतले. विठ्ठल नामाचा जप करत भाविकांच्या अनेक दिंड्या रात्रीपासूनच मंदिराकडे निघाल्या होत्या. यामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता.
शनिवारी पहाटेच श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये राजकीय नेते व अभिनेत्यांनी दर्शन घेतले. कोट्यवधी जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना तावडे यांनी विठुरायाच्या चरणी केली. तसेच विठ्ठल नामाचा जप करित भाविकांच्या अनेक दिंड्या रात्रीपासूनच मंदिराकडे निघाल्या होत्या. यामुळे संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला होता. वारीच्या अनेक पथकात महिलावर्गानेही मोठय़ा संख्येने सहभागी होत फुगड्यांचा ताल धरला.
वडाळातील मंदिरात दिवसभर आषाढी एकादशी निमित्ताने भजन, कीर्तन तसेच प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरात भक्तांची गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक राजकीय पक्षांतर्फे भाविकांना फळ वाटप, पाणी तसचे वृक्ष वाटपही करण्यात आले.