मुंबई - भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा 'चोरबाजार' आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा (Criticism of BJP Hindutva from Samana Editorial) जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Ram Janmabhoomi Trust For The Temple) निकालानंतर अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत, योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. पण त्याच दरम्यान भाजप परिवारातील व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरातील मोक्याच्या जमिनींचे व्यवहार सुरू केले आहेत अस आजच्या सामना अग्रलेखात म्हटले आहे.
भाजपचा धर्माच्या नावावर चाललेला हा व्यापार आहे
मंदिरासाठी राम जन्मभूमी ट्रस्टने 70 एकर जमिनीचे अधिग्रहण केले, पण त्याचवेळी भाजपसंबंधित आमदार, नगरसेवक, पोलीस अधिकाऱ्यांनी जमिनी विकत घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आमदार, महापौर, राज्य ओबीसी आयोगाचे सदस्य, विभागीय आयुक्त, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य माहिती आयुक्त, त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिराच्या चार-पाच किलोमीटरच्या परिसरात कोट्यावधींचा जमीन व्यवहार केल्याचे वृत्त सरकारी नोंदीसह (Land scam in Ayodhya) 'इंडियन एक्सप्रेस'ने दिले आहे. (BJP Hindutva from Samana Editorial)) मंदिर उभारणीनंतर या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल व आज घेतलेल्या जमिनीचे भाव शतपटीने वाढतील असा हा धर्माच्या नावावर चाललेला व्यापार आहे. राममंदिरासाठी लढले कोण? रक्त सांडले कोणी? मेले कोण व मंदिराच्या नावावर मलिदा खाणारे कोण? हे गौडबंगालच आहे. व्यवहार कसा झाला तो पहा.
जे स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत त्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्तेचा सर्वात जास्त फायदा घेतला
अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्या जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला 16 कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. महापौर उपाध्याय हे भाजपचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. (Hindu temple land scam) यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वापासून कशी फारकत घेतली वगैरे प्रवचने भाजपचे पुढारी झोडत असतात. पण भाजपचे हे 'व्यापारी' हिंदुत्व त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरो. व्यवहार आणि व्यापारातून या मंडळींनी प्रभू श्रीरामासही सोडले नाही. राममंदिराचा लढा उभारून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लालकृष्ण आडवाणींना अडगळीत टाकले व आता राममंदिर परिसरात व्यापारी केंद्रे उभी केली. म्हणजे मंदिरासाठी बलिदाने इतरांची व व्यापार यांचे. स्वातंत्र्य विकून खाणारे व राममंदिराचा व्यापार करणारे एकाच जातकुळीचे आहेत. जे स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत त्यांनी स्वातंत्र्यानंतर सत्तेचा सर्वात जास्त फायदा घेतला. तसेच राममंदिर लढ्याचे घडले आहे.