महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गृहपाठाची दृष्टी बदला, शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेवर शिक्षण क्षेत्र, पालकांची सडकून टीका - सरकारच्या मेंदूच्या विकासाची काळजी घेतलीच पाहिजे

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणार नाही. अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली (Announcement of the Minister of Education). यासंदर्भात शिक्षक पालक शिक्षण तज्ञांनी त्यांच्यावर टीका केली आहे (change perception of homework). शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिली घोषणा केली दप्तरांची ओझी कमी करण्याबाबत. त्याविषयी सर्व स्तरातून चौफेर टीका देखील त्यांच्यावर झाली.

गृहपाठाची दृष्टी बदला या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेवर शिक्षण क्षेत्र पालकांची सडकून टीका
गृहपाठाची दृष्टी बदला या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेवर शिक्षण क्षेत्र पालकांची सडकून टीका

By

Published : Sep 17, 2022, 6:51 PM IST

Updated : Sep 17, 2022, 7:19 PM IST

मुंबई -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी पदभार सांभाळल्यावर मागच्या आठवड्यात दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक घोषणा केली. त्या घोषणेचे कवित्व संपत नाही, तोपर्यंत पुन्हा नवीन एक घोषणा त्यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात केली. त्यांनी म्हटलेलं आहे की, 'पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणार नाही.' यासंदर्भात शिक्षक पालक शिक्षण तज्ञ यांची निरनिराळी मते पुन्हा आलेली आहेत. सर्वांनी यावरुन शासनाला धारेवर धरलेले आहे. आधी पाच लाख बालकांना शाळेत शिक्षक नाही. तसेच गृहपाठाबाबत दृष्टी बदलण्यासंदर्भातही पालक तसेच तज्ज्ञांनी भावना व्यक्त केली आहे.

घोषणावर घोषणा -शालेय शिक्षण मंत्र्यांनी पहिली घोषणा केली दप्तरांची ओझी कमी करण्याबाबत. त्याविषयी सर्व स्तरातून चौफेर टीका देखील त्यांच्यावर झाली. दप्तराच्या ओझ्याबद्दल निर्णय घेत असताना प्रत्येक पुस्तकाची किंमत वाढणार आणि प्रकाशकांनाच त्याचा फायदा होणार ही बाब नजरेआड करून चालणार नाही. असे मुद्दे पालक आणि शिक्षकांकडून मांडले गेले होते. आता नवीन घोषणेवर शिक्षण क्षेत्रातून काही मागण्या तर टीका देखील झाली आहे. 'शिक्षण मंत्र्यांनीच आधी गृहपाठ करावा' अशी खोचक प्रतिक्रिया देखील पालकांनी दिली आहे.

गृहपाठाची दृष्टी बदला या शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेवर शिक्षण क्षेत्र पालकांची सडकून टीका

सवंग घोषणा असल्याची टीका -शिक्षण मंत्र्यांच्या नवीन घोषणेवर पालक, शिक्षक शिक्षण तज्ञ यांनी ही सवंग घोषणा असल्याची टीका केलेली आहे. मूलतः गृहपाठ घरी न करणे हे उचित आहे. मात्र केव्हा शक्य आहे. ज्या वेळेला फिनलँडसारख्या देशांमध्ये संपूर्ण शाळा व्यवस्था अत्यंत समान रचनेमध्ये असते. सर्व खर्च सरकार करते. शिक्षकांवर कारकुनी कामाचा बिलकुल बोजा नसतो. तेव्हाच ते शक्य होऊ शकते. जिथे बहुजन समाजातील श्रमिक जनतेची मुलं 100 टक्के सरकारच्याच शिक्षणावर अवलंबून आहेत. त्यांना आधी तुम्ही शाळेमध्ये शिक्षक देत नाहीत. त्यामुळे त्यांचे शिक्षण होत नाही. या स्थितीमध्ये म्हणतात की, गृहपाठ करू नये. आज महाराष्ट्रामध्ये 20,000 शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक नसल्यामुळे पाच लाखपेक्षा अधिक बालके शिक्षकाविना आहेत. शिक्षक नसल्यामुळे एक शिक्षक एका खोलीत चौथी आणि पाचवीचे एकत्र वर्ग घेतात किंवा चौथी आणि सहावीचे एकत्र वर्ग घेतात. असे शिक्षण मुख्यमंत्र्यांच्या मुलाला शिक्षण मंत्र्यांच्या मुलाला-नातवाला चालेल काय, असा सवाल पालक मुमताज शेख, यांनी विचारलेला आहे.

गृहपाठाची दृष्टी बदला

आधी गृहपाठाची दृष्टी बदला मग तुमची सृष्टी बदलेल -ही शिक्षण मंत्र्यांची घोषणा केवळ संवग घोषणा आहे. आधी गृहपाठाची दृष्टी बदला मग तुमची सृष्टी बदलेल. अशी प्रखर टीका शिक्षक भारती संघटनेचे जालिंदर सरोदे यांनी केलेली आहे. ते पुढे म्हणतात की, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तुम्ही त्या भरणार नाहीत आणि मुलांना शाळेमध्ये धड अभ्यासच शिकवला जाणार नाही. तर मग घरी जाऊन त्यामुळे अभ्यास करावा लागतो. केवळ प्रश्नांचे उत्तर लिहून आणा असला गृहपाठ तर बंद झालाच पाहिजे. मात्र जोडवर्ग पद्धत रद्द करा मग पाहा दर्जा सुधारतो कि नाही, असेही ते म्हणाले.

सरकारच्या मेंदूच्या विकासाची काळजी घेतलीच पाहिजे - तर शिक्षणतज्ञ अरविंद वैद्य यांनी यासंदर्भात विश्लेषण मांडले. त्यांचे म्हणणे आहे की, केवळ लोकांनी या शासनाबद्दल कौतुक केले पाहिजे म्हणून ही सवंग घोषणा केली जाते आहे. समजा तुम्ही बासरीचा गायनाचा, वादनाचा क्लास करता. त्याचा घरी जाऊन रियाज करतात की नाही करत. शाळेमधून जर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातले प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर लिहून आणा आणि मुलं तीन तास पलंगावर, खुर्चीवर जमिनीवर बसून प्रश्नाचे उत्तरच काढणार असतील तर असा गृहपाठ तात्काळ बंद करायला पाहिजे. मात्र प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अनुभूतीशी तारतम्य साधणाऱ्या बाबी त्यांच्याकडून शाळेत करून घेतल्या पाहिजेत. घरी तो त्याचा सराव आणि रियाज करेल. गृहपाठाकडे राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आराखडा 2005 च्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही वैद्य म्हणाले. तर शिक्षण अभ्यासक किशोर दरक यांनी सांगितले, 'सरकार बालकांच्या मेंदूच्या विकासाची काळजी घेत आहे. पण जनतेने मात्र सरकारच्या मेंदूच्या विकासाची काळजी आता घेतलीच पाहिजे.

Last Updated : Sep 17, 2022, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details