मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात अधिक टँकर धावू लागले आहेत. ( The number of tankers increased in the state ) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ४५५ गावे आणि १०८१ वाड्यांवर टँकर राज्यात धावत आहेत. यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र ( Severe water scarcity ) झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
तीव्र पाणीटंचाई : राज्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाणीटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबादमध्ये नुकताच "जल आक्रोश" मोर्चा काढण्यात आला. ( Jal Akrosh March in Aurangabad ) मराठवाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाई तीव्र होत असल्याचे दिसते आहे. मात्र, त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही वाड्यावस्त्यांवर टँकर धावू लागले आहेत.
मराठवाड्यातील स्थिती : मराठवाड्यातील ४३ गावांमध्ये आणि २३ वाड्यांमध्ये सोळा शासकीय, तर ४३ खासगी टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. मराठवाड्यात एकूण ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी याच दिवशी मराठवाड्यात ६७ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अवर सचिव वर्षा देशमुख यांनी दिली.
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक टँकर : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ११७ गावे आणि ११९ वाड्यांवर ४५ शासकीय आणि ५७ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०२ टँकरद्वारे जनतेला पाणी दिले जात आहे. गतवर्षी याच दिवशी उत्तर महाराष्ट्रात ९१ गावे आणि १०८ वाड्यांमध्ये ७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.