मुंबई -दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलन प्रकरणी उमर खालिद सहित 'फ्रि काश्मीर'चा फलक दाखवणारी तरूणी महेक प्रभू यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाच्या संदर्भात मुंबईतील कुलाबा पोलीस ठाणे आणि रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
'गेट वे ऑफ इंडिया' आंदोलन प्रकरणी दोन पोलीस स्थानकात गुन्हे दाखल... हेही वाचा... 'फ्री काश्मीर' फलकावरून महाराष्ट्रात वादंग, बॅनर झळकावणारी तरुणी म्हणते...
गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलन प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सुवर्ण साळवे, मिठी बोरवाला, उमर खालिद यांच्यासह 34 जणांच्या विरोधात कलम 153 ब नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. याबरोबरच गेट ऑफ इंडियाजवळ सोमवारी 'फ्री कश्मीर' नावाचे फलक झळकवणाऱ्या महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
हेही वाचा... शिवसेनेत एकमत नसल्याने परभणीत जिल्हापरिषद अध्यक्षासह उपाध्यपदही राष्ट्रवादीकडे
एमआरए मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या पैकी एक गुन्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा चौक येथे केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात आहे. बेकायदेशीररित्या जमाव जमवून आंदोलन केल्याचा गुन्हा या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेला आहे.
भूमिका स्पष्ट करूनही महेकवर गुन्हा...
मुंबईतही रविवारी मध्यरात्री गेट वे ऑफ इंडिया येथे विविध विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन सुरू केले गेले. या आंदोलनादरम्यान सोमवारी महेक या मुंबईमधील विद्यार्थिनीने 'फ्री काश्मीर' चे फलक झळकावले. महेकने हे फलक का लावले? हे स्पष्ट केले. 'मी काश्मिरी नसून महाराष्ट्रीयन आहे. आपल्याला जसे स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच स्वातंत्र्य काश्मिरच्या जनेतला द्यावे. तेथे इंटरनेट सेवा सुरू करावी', असे ती म्हणाली. मात्र, माझ्या फलक झळकवण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. त्यामुळेच हा वाद निर्माण झाला असल्याचे महेक म्हणाली होती.