मुंबई - अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणीवसूल केल्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक ओम वांगटे यांना अटक केली आहे. न्यायालयाने वांगटे यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वांगटे हे लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.
PI Arrested Extortion Case : खंडणी वसूली प्रकरणात पोलीस निरीक्षकाला गुन्हे शाखेकडून अटक
एका व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वांगेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांना जामीन मिळू शकला नाही. यापूर्वी क्राईम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) पोलीस निरीक्षक नितीन कदम आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना १९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी ओम वांगटे, नितीन कदम आणि समाधान जमदाडे या तीन पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात सहभागी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.
हेही वाचा -दोन सख्ख्या भावांचा खून व तिसऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दुहेरी जन्मठेप