मुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे आता ऑनलाइन शिक्षणास अनेकांनी पसंती दर्शवली आहे. अशातच मार्केटमध्ये विद्यार्थांच्या सोयी, सुवीधेसाठी अनेक शैक्षणिक ॲपचा समावेश होतोय. यामध्ये प्रसिद्ध भारतीय कंपनी BYJU'S चा देखील समवेश झाला आहे. या ॲपच्या माध्यमातून अभ्यास करणे अनेकांसाठी सोयीचे ठरले आहे. मात्र याच ॲपमुळे यूपीएससीच्या अभ्यासक्रमात चूकीची माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल BYJU'Sॲपचे सर्वेसर्वा रवींद्रन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
क्राइमफोबिया कंपनीचे संस्थापक स्नेहील यांनी बायजू विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, बायजूने त्यांच्या UPSC च्या अभ्यासक्रमात सीबीआय संयुक्त राष्ट्राच्या UNTOC ची नोडल एजन्सी असल्याचे म्हटले आहे. तसेच हि अयोग्य माहिती असून सीबीआयने लिखितमध्ये ते UNTOC ची नोडल एजन्सी नसल्याचे तक्ररादाराने स्पष्ट केले आहे. इतकेचं नाही तर स्नेहिल यांनी बायजूला मेल करुन संबधीत माहितीत बदल करावा अशी मागणी केली होती. यानंतर प्रत्युतर म्हणून त्यांनी सीबीआय नोडल एजन्सी असल्याचे गृहमंत्रालयाचे पत्र पाठवले. पण ते पत्र २०१२ चे होते. यामुळे स्नेहिल यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.